शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (13:55 IST)

मुलांना कथा सांगून चांगल्या गोष्टी शिकवा

आपण सर्वांनी आपल्या बालपणीत आजी-आजोबांकडून खूप गोष्टी ऐकल्या आहेत. दररोज रात्री झोपण्यापूर्वी गोष्ट ऐकणे हा रोजचा भाग असायचा .या गोष्टींपासून आपण बरेच धडे शिकलो आहोत, आणि किती तरी भर आपल्या ज्ञानात पडली आहेत. लहानपणीच्या चांगल्या सवयी वडीलधारी त्याच गोष्टींमधून आपल्याला देत होते. आपण देखील आनंदानं त्या गोष्टींना समजून स्वीकारायचो. 
 
गोष्टी या पिढ्यानं पिढ्या चालत येत आहेत कारण आपल्या जीवनात गोष्टी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यांचा आपल्या मेंदूवर खूप खोल परिणाम होतो. 
 
म्हणूनच जर मुलांची गोष्ट निघत असल्यास तर या गोष्टी मुलांसाठी कोणत्या ज्ञानापेक्षा कमी नाही.

हळू-हळू काळ बदलत गेला आणि संयुक्त कुटुंब आता एकल कुटुंबात बदलू लागला. मुलांना गोष्ट सांगायला कोणाकडेच वेळ नाही. कारण आपण याचा विचार तर केलाच नाही की मुलांना गोष्ट सांगणे त्यांचा मेंदूच्या विकासासाठी किती महत्त्वाचे आहे. मुलांना गोष्ट सांगणे आणि त्या गोष्टीतून चांगले आणि वाईट आणि योग्य आणि चुकीची विचारसरणी विकसित करणे खूप महत्त्वाचे आहे.
 
एकट्या कुटुंबात मुलांच्या संगोपनाच्या पद्धतीत फार बदल घडवून आणले आहेत. पूर्वी मुलं मोठ्यां वडिलधाऱ्यांकडून चांगले संस्कार शिकत होते. सर्वांचा ह्याचा कडे जास्त कल असायचा की मुलांना योग्य संस्कार मिळावे आणि तो फार गुणी व्हावा. पण सध्याच्या काळात सर्वांचा कल याचा कडेच आहे की मुलाला चांगले शिक्षण मिळावे व इंग्रेजी बोलता यावे.
 
 एखादी व्यक्ती सुशिक्षित असून देखील अज्ञानी असू शकते. जर त्याचा कडे नैतिक मूल्य नसतील तर आणि ज्या माणसाकडे नैतिक मूल्य आहेत जरी तो शिकलेला नसेल तरी ही तो ज्ञानी म्हणवला जाईल. आणि इंग्रेजी बोलता येत नसून देखील तो शिकलेला म्हणवला जाऊ शकतो कारण त्यामध्ये योग्य आणि चूक जाणून घेण्याची समज आहे. म्हणून आता हे आपल्यालाच ठरवायचे आहे की आपल्याला आपल्या मुलांना काय बनवायचे आहे. इंग्रज तर त्यांना शाळा बनवून देणारच आहे पण संस्कार ? जे संस्कार त्यांना घरातून मिळतात ते शाळेतून मिळत नसतात. म्हणून मुलाला प्रेरणादायी गोष्टींचा ज्ञानाचा भांडार देणं महत्त्वाचं आहे.
 
संशोधनात हे सिद्ध झाले आहेत की जेव्हा एखादे मुलं गोष्ट ऐकतो तेव्हा तो आपल्या डोक्यात बऱ्याच आकृतींना जन्म देतो आणि वस्तुंना कल्पनेतून समजून घेतो या मुळे त्याला एखादी गोष्ट समजण खूप सोपं होतं. 
 
मुलांचा मनावर कथेचे परिणाम - 
* गोष्टीमध्ये बऱ्याचदा लोकांची मदत करणं, चुकीच्या गोष्टी न करणं आणि बऱ्याच गोष्टी शिकतात जे पुढे जाऊन त्यांना त्यांच्या जीवनात कामी येतात.
 
* गोष्टींमधून मुलं समस्या सोडविणे शिकतात. 
 
* गोष्टींच्या माध्यमातून आपण मुलांच्या वागणुकीबद्दल काल्पनिक गोष्टी बनवून त्यांना सांगू शकतो.
 
* प्रेरणादायी गोष्टी सांगून आपण मुलांना समाजाला समजणे आणि कठीण परिस्थितींचा सामना कसा करावा हे शिकवावे.
 
* आपण अगदी कठीण नियम बनवून देखील मुलांकडून जे काम करू शकत नाही ते काम ते गोष्टीला प्रेरित होऊन सहजरित्या करतात. 
 
* गोष्टीनं माध्यम बनवून त्यांना चांगले कार्य करायला प्रेरित करावे. तसेच त्यांनी एखादे चांगले काम केल्यावर त्यांचे गोड कौतुक करावे.
 
* गोष्ट संपल्यावर त्यांना एक धडा सांगावा आणि त्यांच्या कडून जाणून घ्यावे की या गोष्टीपासून आपण काय शिकला. 
 
* मुलांना आपल्या बालपणीच्या गोष्टी सांगा. आपल्या खोड्या आणि चांगल्या गोष्टी त्यांचा सह सामायिक कराव्यात. तसेच त्यामध्ये असे काही जोडून सांगा की जेणे करून त्यांना शिकवण मिळेल. 
 
* मुलं लहानपणी जीवनाचे मोठे धडे आणि ज्ञान शिकतात पण हे ज्ञान जेव्हा आपण त्यांना सांगतो तेव्हा हे त्यांना भाषण वाटू लागत.

* मुलं एक प्रकारच्या गोष्टीने लवकरच कंटाळतात त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्यात या साठी आपल्याला गोष्टी वाचत राहावं लागणार.
 
* आपण या गोष्टी इंटरनेट किंवा पुस्तकातून देखील वाचू शकता, पण लक्षात ठेवा की मुलांना गोष्टी यूट्यूब किंवा इतर कोणत्या माध्यमाने बघण्यास सांगू नका.
 
* गोष्टीचे व्हिडीओ बघितल्यावर मुलं त्या गोष्टींची कल्पना करू शकत नाही कारण तो जे ऐकतो ते त्याला समोर दिसत.
 
* आपण गोष्ट ऐकवता तेव्हा तो त्या गोष्ट मधील पात्राची कल्पना करतो आणि संपूर्ण गोष्ट तयार करतो तसेच आपण आपला दिलेला वेळ देखील त्यांच्यासाठी सर्वात विशेष ठरतो. म्हणून आपण दररोज आपल्या मुलांना एक गोष्ट आवर्जून सांगा जेणे करून ते दररोज जीवनाचा चांगला धडा घेऊ शकतील.