देव-दोष म्हणजे काय ? जाणून घ्या आगळी वेगळी माहिती

vishnu
Last Updated: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (15:05 IST)
ज्योतिशास्त्राच्या मान्यतेनुसार, प्रथम भाव म्हणजे कुळदोष शरीर वेदना, द्वितीयभाव आकाश देवी, तृतीयभाव अग्निदोष, चतुर्थ भाव प्रेत दोष, पंचम भाव
देवी-देवांचा दोष, सहावा भाव ग्रहदोष, सातवा भाव लक्ष्मी दोष, आठवा भाव सर्पदोष, नववा भाव धर्मस्थान दोष, दहावा भाव पितृ दोष, लाभ भाव ग्रहदशा दोष, व्यय भाव मागील जन्माचे ब्रह्मदोष असतात.

असे म्हणतात की एखादा ग्रह कोणत्या भावाने पीडित असल्यास, सूर्य दोन ग्रहांमुळे ग्रासलेले असल्यास ज्या घरात असतो तो दोष मानतात. इथे आपण देव दोष कशामुळे लागतो ह्या मागील कारणे जाणून घेऊ या. तसेच या पासून वाचण्याचे काही उपाय देखील जाणून घेऊ या.

सर्वप्रथम आपण देव ऋणांबद्दल जाणून घेऊ या -
देवदोष आणि यात अंतर आहे. ऋण चार असतात - देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण आणि ब्रह्मा ऋण. असे मानले जाते की देव ऋण भगवान विष्णूंचे असते. हे ऋण उत्तम चारित्र्य ठेवून दान आणि यज्ञ करून फेडले जातात. जे लोक धर्माचा अपमान करतात किंवा धर्माबद्दल भ्रम पसरवतात किंवा वेदांच्या विरुद्ध वागतात, त्यांच्यावर हे ऋण दुष्परिणाम करण्याचे सिद्ध होतात.

देव दोषाचे 5 कारणे - ज्योतिषानुसार देव-दोष पूर्वीच्या पूर्वजांकडून वडिलधाऱ्यांकडून चालू असून याचा संबंध देवांशी असतो.
1 असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीने किंवा त्याचा कुटुंबीयांनी त्यांचे पूर्वज, गुरू, पुजारी, कुळदेवी किंवा देवांना मानने सोडले असल्यास हा दोष सुरू होतो.

2 असे देखील असू शकते की हे सर्व या गोष्टींवर विश्वास ठेवत असणार पण त्यांनी किंवा त्यांच्या पूर्वजांनी कधी तरी पिंपळाचे झाड कापले असणार किंवा एखाद्या देवस्थळाला तोडले असणार तरी देखील देवदोष सुरू असतो.

3 बऱ्याचदा असे ही घडते की एखाद्या व्यक्तीने किंवा त्याचा कुटुंबीयातील सदस्याने एखाद्या संत, साधू किंवा कोणत्यातरी विचारधारेच्या प्रभावाखाली येऊन देवी-देव कुळाचाराला मानायचे सोडले असेल किंवा नास्तिक झाल्यावर हा प्रकार घडून येतो.

4 असे मानतात की एखाद्या देव-देवीकडे नवस मागितल्यावर ते नवस पूर्ण झाल्यावर देखील नवस फेडत नाही अशा परिस्थितीत देखील देव-दोष लागतो. असे देखील होत की एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांनी नवस मागितले असणार आणि त्या नवसाला फेडले नसणार. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्या तीर्थक्षेत्र किंवा देवस्थळी जाऊन नवस मागतो की आमची ही इच्छा पूर्ती व्हावी आम्ही हे पूर्ण झाले की आपल्याला पूजा भेट, नैवेद्य, दर्शन इत्यादी करू. पण प्रत्यक्षात असे करत नाही. असे नवस पूर्ण न केल्यानं देखील हा दोष लागतो.

5 असे देखील असू शकतं की एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांनी आपले धर्मपरिवर्तन केले असणार आणि तो दुसऱ्या देवाला मानत असणार तर त्याने केलेल्या कर्माचे फळ त्याच्या मुलांना भोगावे लागतात. गीतेमध्ये श्रीकृष्णांनी स्वधर्म आणि कुळधर्माबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे. ज्योतिषानुसार याचा संबंध बृहस्पती आणि सूर्याशी असतो. बृहस्पती नीच आणि सूर्य देखील नीच असल्यास किंवा दोन्ही ग्रह एखाद्या वाईट ग्रहाच्या फेर्‍यात अडकल्यास देखील असे मानतात की जातकाच्या कुळाचे धर्म बदलले असणार.

या दोषाचा प्रभाव - या दोषाचा प्रभाव पहिले मुलांवर होतो. अपत्ये होत नाही, अपत्ये असतात तर ते देखील खूप त्रास देणारे असतात. आयुष्य कधीही आनंदाने निघत नाही, निघतं असलं तरी कोणते न कोणते त्रास उद्भवतात. आजारपण, दुःख, असतातच याचा दुसरा प्रभाव नोकरी आणि व्यवसायांवर पडतो या मध्ये स्थैर्यता येत नसते.

उपाय - या दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्या कुळदेव किंवा देवी आणि कुळधर्माचे पालन करावे. उत्तरमुखी असलेल्या घरात राहावे आणि एखाद्या ठिकाणी एक पिंपळाचे झाड लावून त्याची सेवा करावी. घरात गीतेच्या पाठाचे आयोजन करावं.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

काय सांगता, प्रभू श्रीराम पंचवटी नाशिक मध्ये राहिले या 8 ...

काय सांगता, प्रभू श्रीराम पंचवटी नाशिक मध्ये राहिले या 8 गोष्टी जाणून घेऊ या
वाल्मिकी रामायण, अरण्यकांड मध्ये पंचवटीचे रंजक वर्णन आढळते. या शिवाय पंचवटीचे वर्णन ...

घरात तुळस लावली आहे हे नियम लक्षात ठेवा

घरात तुळस लावली आहे हे नियम लक्षात ठेवा
सनातन धर्मात तुळस ही अतिशय पूजनीय मानली आहे. ही केवळ पूजेसाठीच नव्हे तर औषधी गुणधर्मासाठी ...

हरिद्वाराचा लक्ष्मण झूला : भारताचे प्रेक्षणीय आणि पर्यटन ...

हरिद्वाराचा लक्ष्मण झूला : भारताचे प्रेक्षणीय आणि पर्यटन स्थळ
उत्तरांचल प्रदेशात गंगेच्या काठावर वसलेली कुंभ शहर हरिद्वार मायापुरी नावाने देखील ओळखले ...

वसंत पंचमी 2021 : वसंत पंचमी साठी विध्यार्थ्यानी काय करावं ...

वसंत पंचमी 2021 : वसंत पंचमी साठी विध्यार्थ्यानी काय करावं जाणून घ्या
यंदाच्या वर्षी वसंत पंचमी 16 फेब्रुवारी रोजी येत आहे. सरस्वती वसंत पंचमीचे शुभ मुहूर्त ...

गुरूपुष्यामृत योगाचे महत्त्व

गुरूपुष्यामृत योगाचे महत्त्व
ज्योतिष शास्त्रात ग्रह, नक्षत्र, वार, करण, तिथी, मास आदी महत्त्वपूर्ण घटक असतात. त्यांचा ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...