बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2019 (12:21 IST)

तुम्ही रात्री काळे कपडे घालता का? तर सावध होऊन जा....

आम्ही बर्‍याच वेळा बघतो की काही लोकांना रात्री काळे वस्त्र परिधान करण्याची सवय असते. पण त्यांना कदाचित हे माहीत नाही की रात्री काळे कपडे नाही घालायला पाहिजे. आमच्या शास्त्रात देखील असे सांगण्यात आले आहे की रात्री काळे कपडे घालणे टाळावे. पण हे न घालण्यामागचे कारण जाणून घ्या.... 
 
हिंदू शास्त्रानुसार कुठल्याही व्यक्तीला रात्री काळे कपडे नाही परिधान करायला पाहिजे. असे सांगण्यात येते की काळे कडे नकारात्मकतेचा प्रतीक असतो आणि रात्रीच्या वेळेस नकारात्मक शक्तींचा वास असतो. म्हणून शास्त्रात असे म्हटले आहे की जेव्हा कोणी रात्री काळे कपडे परिधान करतो त्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. 
 
त्याशिवाय रात्री काळे कपडे घातल्याने वास्तुदोष देखील उत्पन्न होतो. यामुळे घरातील इतर सदस्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते आणि कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये वाद विवाद होतात.