सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

अशा पद्धतीचा आहार देऊ शकतो गंभीर आजार किंवा मृत्यूला आमंत्रण

भोजनासाठी हिंदू शास्त्र आणि आयुर्वेदात काही नियम सांगितले गेले आहेत. अन्नामुळेच व्यक्ती निरोगी राहू शकतो आणि अन्नामुळेच आजार देखील उद्भवतात. तर जाणून घ्या असे काही नियम, ज्याकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर आजार होऊ शकतात.
 
तसं तर कोणत्याही प्रकाराच्या खाद्य पदार्थांचा अपमान करू नये कारण या जगात लाखो लोकं असे आहेत ज्यांना अनेकदा भोजन मिळणे देखील अशक्य होऊन बसतं. अशात येथे सांगण्यात आलेले नियम त्या लोकांसाठी आहेत जे प्रगतीच्या मार्गावर आहेत.
 
उपाशी व्यक्तीला तर आपण कुठलंही जेवण द्या त्याचं शरीराची भूक भागवणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरेल. त्यासाठी कोणत्याही प्रकाराचे भोजन अमृततुल्य ठरेल. अशात येथे सांगण्याची गरज भासते की भोजन आपली मनोदशा आणि भावनेवर आपले गुणधर्म बदलतं.
 
हिंदू धर्मात तीन प्रकाराच्या भोजनाचे उल्लेख सापडतं. सात्त्विक, राजसिक आणि तामसिक. आपण इच्छुक असल्यास या तिन्ही प्रकाराचे भोजन ग्रहण करू शकता. तामसिक भोजन करणारे अनेक लोक असतात. तरी येथे सांगण्याची गरज आहे की भोजन कसंही असलं तरी संतुलित आणि शुद्ध नसल्यास आजार उत्पन्न करतं. तसेच भोजन पचत नसल्यास देखील आजार होण्याची शक्यता वाढते. एकूण भोजन वेळेवर पचणे आवश्यक आहे. भोजन पचनासाठी औषध घेणे उपाय नाही. तर जाणून घ्या कशा प्रकारे भोजन असले पाहिजे.
 
1. शिळं भोजन, कुत्र्याने शिवलेलं, केस पडलेलं, मासिक धर्मात असलेल्या स्त्रीने वाढलेलं, फुंका मारून गार केलेलं भोजन करू नये. कारण अशा भोजनात लाखो प्रकाराचे कीटाणू आढळतात.
 
2. श्राद्धाचे काढलेले, अपमानजनक आणि दुर्लक्ष करून वाढलेले भोजन देखील करू नये कारण याने भोजनातील गुणधर्म बदलून जातात. यामुळे शरीराला नुकसान होऊ शकतं.
 
3. कंजूष व्यक्ती, राजा, वैश्याने तयार केलेले, दारू विकणार्‍यांनी दिलेले भोजन कधी करू नये कारण असं जेवण दोषयुक्त असतं.
 
4. ज्याने ढोल वाजवत लोकांना जेवण्याचे निमंत्रण दिले असेल त्यांच्याकडे भोजन करू नये. तसंही भंडारा त्या लोकांसाठी उपयुक्त नाही जे धर्म, साधना आणि प्रगतीच्या मार्गावर आहे.
 
5. ईर्ष्या, भय, क्रोध, लोभ, दीन आणि द्वेष भावना ठेवत तयार केलेले भोजन पचत नाही. तसेच या भावनेसह वाढलेले भोजनाचा देखील त्याग करावा.
 
6. ज्या भोजनाची निंदा होत असेल किंवा भोजन ग्रहण करत असलेला स्वत: देखील निंदा करत भोजन करत असेल असं भोजन आजार उत्पन्न करतं. भोजनाची निंदा केल्याने त्याची गुणवत्ता बदलून आपलं आयुष्य कमी होऊ शकतं.
 
7. भोजन स्वच्छ जागेवर तयार केलेलं असावं. अंघोळ केल्याविना तयार केलेले भोजनाचे सेवन करू नये.
 
8. कोणी दान केलेले, फेकलेले, किंवा उष्टं सोडून दिलेलं जेवण ग्रहण करून नये. वाद-भांडण करत तयार केलेले भोजन तसेच ओलांडलेले भोजन ग्रहण करून ये. असं भोजन राक्षसी भोजन असतं.
 
9. अर्ध सेवन केलेलं फळ, मिष्टान्न किंवा इतर कोणतेही खाद्य पदार्थ पुन्हा सेवन करू नये यात किटाणूंचे प्रमाण वाढलेलं असतं. अनेक लोक अर्धे खाल्लेले पदार्थ झाकून ठेवून देतात किंवा फ्रीजमध्ये ठेवून देतात. असे करणे योग्य नाही. आपण आहार घेत असताना मध्येच उठून पुन्हा थोड्या वेळाने जेवत असाल तर ही सवय सोडावी.
10. प्रतिपदेला कुष्माण्ड (कुम्हडा पेठा) खाऊ नये कारण याने धनाचा नाश होतो. 
द्वितीया तिथीला लहान वांगी आणि फणस खाणे निषेध आहे. 
तृतीयेला मुरमुरे खाणे टाळावे याने शत्रूंची संख्या वाढते. 
चतुर्थीला मुळा खाऊ नये याने धन हानी होते. 
पंचमीला बेल खाण्याने कलंक लागण्याची शक्यता असते. 
षष्ठीला कडुलिंबाची पाने खाणे आणि त्याने दात घासणे निषेध आहे. असे केल्याने नीच योनी प्राप्त होते.
सप्तमीला पाम फळ खाणे निषेध आहे. याचे सेवन केल्याने आजार होतो. 
अष्टमीला नारळ खाणे टाळावे कारण याने बुद्धीचा नाश होतो. 
नवमीला दुधी भोपळा खाणे टाळावे. या दिवशी दुधी भोपळ्याचे सेवन गोमांस खाण्यासमान आहे. 
दशमीला कलांबी खाणे निषेध आहे.
एकादशीला पावटा भाजी खाणे निषेध आहे. 
द्वादशीला (पोई) मयालु खाणे टाळावे. 
त्रयोदशीला वांगी खाणे टाळावे. 
अमावस्या, पौर्णिमा, संक्रांती, चतुर्दशी आणि अष्टमी, रविवार श्राद्ध आणि उपासाला स्त्री सहवास आणि तिळाचे तेल, लाल रंगाच्या भाज्या आणि कांस्य पात्रात भोजन करणे निषेध आहे.
 
रविवारी आलं खाऊ नये. 
कार्तिक महिन्यात वांगी आणि माघ महिन्यात मुळा खाणे त्यागावे. 
लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असणार्‍यांनी रात्री दही आणि सातू खाऊ नये. 
या प्रकारे आहार घेताना खाद्य पदार्थांच्या मेळासंबंधी माहिती असल्यावरच त्यांचे सेवन करावे.