मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 15 एप्रिल 2021 (21:19 IST)

देवपूजा आणि अध्यात्मिक उपयोगाच्या सुंदर गोष्टी

1. परान्नचे दोषाने उपासने मध्ये अडथळे व त्रुटी  निर्माण होतात.
 
2. मंत्र, स्तोत्रे, ग्रंथ यांची दिल्या प्रमाणे फलश्रुती अनुभवास न येण्याची कारणे म्हणजे पूर्व कर्माची प्रतिकुलता, तीव्र इच्छा शक्तीचा अभाव, श्रद्धा हीनता, वैयक्तिक आचरणाची दूषित पार्श्र्वभूमी इत्यादी आहेत.
 
3. वनस्पती तूप धार्मिक दृष्ट्या व आरोग्य दृष्ट्या निषिध्द मानले आहे.
 
4. चुंबकीय आकर्षणाचे विरुद्ध म्हणजे दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास अन्न पचनास अडथळे निर्माण होऊन ज्ञान तंतुंच्या उलट गतीने क्रिया होऊन मस्तक शिण येऊन ,वाईट स्वप्ने पडून, वारंवार जाग येऊन निद्रा अपुरी होते.
 
5. देवघरात कमीत कमी मूर्ती अगर टाक असावेत. जेणे करून नित्य देवपूजा आटोपशीर राहून कंटाळवाणी होणार नाही.
 
6 .नवीन मूर्तीची षोडोपचारे पूजा करून प्रतिष्ठापना केली तरी चालते.
 
7. आचमन म्हणजे पळीने तीन वेळा उजव्या तळहातावर पाणी घेणे व चौथ्यांदा उजव्या तळहातावरून एक पळी पाणी सोडणे. या आचमन क्रियेमुळे तीन वेदांची संतुष्टता प्राप्त होते. व मनास व देहास करावयाच्या कर्मास प्रसन्नता प्राप्त होते. व शिंक, ढेकर, जांभई, इ. चा कर्मक्रिया करताना उपद्रव कमी होतो.
 
8. नित्य पूजा, स्वाध्यायसाठी कुशासन किंवा लोकरीचे आसनावर, धूत वस्त्र हे उत्तम आसन आहे. त्यामुळे पृथ्वीची उष्णता, ऊर्जा, गुरुत्वाकर्षण यांचा उपद्रव होत नाही. शिवाय साधनेने जास्त उष्णता निर्माण झाली तर तिचा निचरा होतो.
 
9. गळ्यात घालण्याची माळ जपासाठी वापरू नये. व जपसाठी असलेली माळ गळ्यात घालू नये.
 
10. सपिंड म्हणजे भावकी असा सामान्य अर्थ होतो. सगोत्र विवाह व मामे बहिणीशी विवाह संततीच्या दृष्टीने अयोग्य आहेत.
 
11. कुठल्याही दैवताची सकाम सेवा सुरू केल्यानंतर व काम झाल्यावर सेवा सोडून दिल्यास भविष्यात अवघड समस्या निर्माण होतात.
 
12. भाऊ- भाऊ, पिता- पुत्र विभक्त राहत असले तरी देव्हारा, देवकर्म, व्रते, कुलाचार, कुलधर्म स्वतंत्ररीत्या करावीत.
 
13. श्री गुरु चरित्र पारायणात मधेच अशौच आल्यास दुसऱ्या गोत्राचे व्यक्ती कडून राहिलेले पारायण पूर्ण करून घ्यावे. हा वेदतुल्य ग्रंथ अर्धवट ठेवणे महादोषस्पद ठरते.
 
14. दर वर्षाला घरी एक श्रीमत् भागवत पारायण केल्यास घराण्याचे बरेच सौम्य दोष जातात.
 
15. कली युगात गुरु प्रणित मार्ग व नाम मंत्र श्रेष्ठ व शीघ्र फलदायी आहेत. कलियुगात पुण्यकर्म शीघ्र फलप्रद असते. पण पाप कर्मे शीघ्र परिणामकारक नसतात. त्यामुळे सामान्य माणसाचे श्रध्देत अस्थिरता निर्माण होते.
 
16. ईश्वर कृपा म्हणजे मोठी संकटे व दुःखे सहन करण्याचे सामर्थ्य व त्या काळातही ईश्र्वरावरील श्रद्धा अढळ व गाढ राहणे हे होय.
 
17. जप माळ कुठेही पडलेली असू नये, इतर ग्रंथा सारखीच व्यवस्थित व योग्य ठिकाणी ठेवावी.
-सोशल मीडिया