मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (12:56 IST)

हिंदू धर्माप्रमाणे 'गायी' बद्दल मनोरंजक माहिती

भारत कृषी देश असल्यामुळे येथे गायीचं फार महत्त्व आहे. हिंदू धर्मात गायीचं महत्त्व असल्याचे काही आध्यात्मिक, धार्मिक आणि चिकित्सीय कारणंही आहेत. अता आपण पाहू काही वैज्ञानिक तथ्य:
 
* गाय एकमेव असा प्राणी आहे जिच्याहून मिळणारी प्रत्येक गोष्ट उपयोगी आहे.
 
* एक गाय आपल्या जीवनात 4,10,440 माणसांसाठी एका वेळेचे अन्न पुरवते जेव्हाकि तिच्या मांसाने 80 मासांहारी लोकं आपलं पोट भरू शकतात.
 
* गायीचं दूध, मुत्र, शेण या व्यतिरिक्त दुधाने तयार होणारे पदार्थ सर्वकाही अतिशय उपयोगी आहे.
 
* वैज्ञानिक शोधाप्रमाणे गायीत जेवढी सकारात्मक ऊर्जा असते तेवढी कोणत्याही इतर प्राण्यात नाही.
 
* गायीच्या पाठीवरील हाडात आढळणारे सूर्यकेतु स्नायू हानिकारक किरणांना थांबवून वातावरण निर्मल करतात
 
* सूर्यकेतु नाडी सूर्याच्या संपर्कात आल्यावर सोनं उत्पन्न करते. गायीच्या शरीरातून उत्पन्न हे सोनं गायीच्या दूध, मुत्र व शेण या रूपाने प्राप्त होतं. म्हणून बर्‍याच रोगांवर उपचार म्हणून हे औषध रूपात देण्यात येतं.
 
* वैज्ञानिक म्हणतात की गाय एकमेव ऑक्सिजन ग्रहण करून ऑक्सिजन उत्सर्जन करणारं प्राणी आहे.
* 10 ग्राम गायीच्या तुपाने यज्ञ केल्याने एक टन ऑक्सिजन तयार होते.
 
* देशी गायीच्या एक ग्राम शेणात कमीत कमी 300 कोटी जिवाणू असतात.
 
* गायीच्या दूध, दही, तूप, मुत्र आणि शेणाद्वारे पंचगव्य निर्मित केलं जात असून याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
 
* हिंदू धर्माप्रमाणे गायीत 33 कोटी देवी-देवता वास करतात. पण येथे कोटीचा अर्थ प्रकार आहे. अर्थात गायीत 33 प्रकाराचे देवता वास करतात. हे देव आहे- 12 आदित्य, 8 वसू, 11 रुद्र आणि 2 अश्‍विन कुमार.