बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (17:41 IST)

हिंदू धर्मात कन्यादान सर्वात मोठे दान असे का म्हणतात

हिंदू धर्मात जेव्हा वडील आपल्या मुलीचा हात मुलाला सोपवतात त्या विधीला कन्या दान असे म्हटले गेले आहे. या संस्कारात वडिलाच्या हातावर मुलीचा हळद लावलेला हात आणि वडिलांच्या हाताखाली मुलाचा हात ठेवतात ज्यात कन्येच्या हातावर वडील काही गुप्त दान आणि फुल ठेवतात. मंत्रोच्चारणासह वडील आपल्या मुलीचा हात मुलाच्या हातात सोपवतात. तर जाणून घ्या का केलं जातं कन्यादान
 
हिंदू धर्मात विवाहाला पाणिग्रहण संस्कार मानले गेले आहे. ज्यात वरला विष्णू आणि कन्येला धनलक्ष्मी स्वरूप मानले आहे. कन्यादानाचा अर्थ आई-वडील आपल्या घरची लक्ष्मी आणि संपत्ती वरला सोपवत आहे. आणि तेव्हापासून त्यांच्या मुलीची जबाबदारी तिचा नवर्‍याला निर्वहन करायची असते. आपल्या मुलीचा हात सोपवताना आई-वडील अपेक्षा करतात की सासरी देखील तिचा तसाच प्रेमाने आणि सन्मानाने वागणूक मिळेल जे त्यांच्या घरात तिला मान दिला जातो. म्हणून या विधीला महत्त्व दिले गेले आहे.
 
हिंदू धर्मात मानले जाते की जेव्हा आई-वडील कन्यादान करतात तेव्हा माहेर आणि सासर दोन्ही पक्षात सौभाग्य येतं. हे दान केल्याने अर्थात आपली मुलीला दुसर्‍याचं नवीन संसार देण्याचे सौभाग्य प्राप्त होऊन आई-वडिलांसाठी स्वर्गाचे दार उघडतात. म्हणून हे दान महान असल्याचे म्हटले आहे.