कार्तिक महिना: हे 7 नियम पाळा, सौख्य आणि अफाट संपत्ती मिळवा
हिंदू पौराणिक आणि प्राचीन ग्रंथांमध्ये कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व दिले आहेत. धर्मशास्त्रानुसार हा संपूर्ण कार्तिक महिना उपवास आणि तपासाठी विशेष सांगितले आहे. त्यानुसार, जी व्यक्ती कार्तिक महिन्यात उपवास आणि तप करते त्याला मोक्षप्राप्ती होते.
पुराणात म्हटले आहे की भगवान नारायणाने ब्रह्माला, ब्रह्माने नारदाला आणि नारदाने महाराज पृथूला कार्तिक महिन्यातील सर्वगुण संपन्न अश्या माहात्म्य बद्दल सांगितले आहेत. कार्तिक महिन्यात 7 नियम सांगितले आहेत, ज्यांना पाळल्याने शुभ परिणाम मिळतात आणि आपली सर्व इच्छा पूर्ण होते. हे 7 नियम या प्रकारे आहेत.
1 दीप दान - धर्मशास्त्रानुसार, कार्तिक महिन्यात सर्वात मुख्य काम दीपदान करणे आहेत. या महिन्यात नदी, तलाव, तळात इत्यादीमध्ये दीप दान केले जाते.
2 तुळशी ची पूजा करणे - या महिन्यात तुळशीची पूजा करणे आणि सेवन करणे विशेष महत्त्वाचे मानले आहे. तसे तर दर महिन्यात तुळशीची पूजा करणे आणि सेवन करणं चांगलंच असतं पण कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व अनेक पटीने चांगले मानतात.
3 जमिनीवर झोपणं - जमिनीवर झोपणं कार्तिक महिन्याचे तिसरे मुख्य काम सांगितले आहेत. जमिनीवर झोपल्याने मनात सात्त्विकतेची भावना येते आणि इतर आजार देखील नाहीसे होतात.
4 तेल लावणे निषिद्ध - कार्तिक महिन्यात तेल लावू नये. कार्तिक महिन्यात तेल लावणं वर्जित असतं.
5 डाळी खाण्यास मनाई - कार्तिक महिन्यात उडीद, मूग, मसूर, हरभरे, वाटाणे, मोहरी इत्यादी खाऊ नये.
6 ब्रह्मचर्याचे पालन करणे - कार्तिक महिन्यात ब्रह्मचर्याचे पालन करणे फार महत्त्वाचे मानले आहे. त्याचे अनुसरणं न केल्यानं पती-पत्नी दोघांना दोष लागतो आणि त्याचे परिणाम वाईट होतात.
7 संयम बाळगा - कार्तिक महिन्यात उपवास करणाऱ्यांना पाहिजे की त्यांनी तपस्वी सम व्यवहार केले पाहिजे म्हणजे कमी बोलणे, कोणाचीही निंदा-नालस्ती न करणे, वाद न करणे, मनावर ताबा ठेवणे इत्यादी.