शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

शनी जयंती पौराणिक कथा

सर्वविदित मान्यतेनुसार नवग्रह कुटुंबात सूर्य राजा आणि शनीदेव भृत्य आहे परंतू महर्षि कश्यप यांनी शनी स्तोत्राच्या एका मंत्रात सूर्य पुत्र शनीदेवाला महाबली आणि ग्रहांचा राज म्हटले आहे-  ‘सौरिग्रहराजो महाबलः।’ प्राचीन ग्रंथांप्रमाणे शनीदेवाने महादेवांची भक्ती आणि तपस्येने नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान मिळवले आहे.
 
एकेकाळी सूर्यदेव जेव्हा गर्भाधारणेसाठी आपल्या पत्नी छाया यांच्या जवळ गेले तर पत्नीने सूर्याच्या प्रचंड तेजमुळे भयभीत होऊन आपले डोळे बंद करुन घेतले. नंतर छाया यांच्या गर्भातून शनीदेवांचा जन्म झाला. शनी श्याम वर्ण असल्यामुळे सूर्याने आपल्या पत्नीवर आरोप लावला की शनी माझं पुत्र नाही, तेव्हापासून शनी आपल्या वडील अर्थातच सूर्याशी शत्रुता ठेवतात.
 
शनीदेवाने अनेक वर्ष तहान-भूक सहन करत महादेवाची आराधना केली आणि घोर तपस्येने आपली देह दग्ध करुन घेतली होती, तेव्हा शनीदेवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने शनीदेवाला वर मागायला सांगितले.
 
शनीदेवाने प्रार्थना केली की अनेकु युगांपासून माझी आई छाया यांची पराजय होत आहे, त्यांचा माझ्या वडील सूर्याकडून अपमानित व प्रताडित केले गेले आहे. म्हणून मी आपल्या वडीलांपेक्षा अधिक बलवान, सामर्थ्यवान आणि पूजनीय होऊ अशी माझ्या आईची इच्छा आहे.
 
तेव्हा महादेवाने त्यांना वरदान देत म्हटले की नवग्रहांमध्ये आपलं स्थान सर्वश्रेष्ठ असेल. आपण पृथ्वीलोकात न्यायाधीश व दंडाधिकारी असाल.
 
सामान्य मानवचं नाही तर देवता, असुर, सिद्ध, विद्याधर आणि नाग देखील आपल्या नावाने भयभीत होती. ग्रंथांप्रमाणे शनीदेवांचे गोत्र कश्यप असून सौराष्ट्र त्यांची जन्मस्थळी असल्याचे मानले जाते.