गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 4 डिसेंबर 2024 (12:59 IST)

श्री मल्हारी मार्तंड विजय अध्याय आठवा

॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ नंदीरुढ मार्तंड भैरवरुप धरिलें ॥ चंद्रसूर्य झळकती कुंडले ॥ डमरुखड्गबाणत्रिशुल ॥ रुंडमाळा गळा शोभे ॥१॥
रत्नापरि दंत त्रिनयन ॥ मयूरपुच्छ चामर मुकुट धारण ॥ सप्तकोटी पिशाच्चगण ॥ सेनाचूर्ण उधळिती ॥२॥
देव वज्र कवच ल्याले ॥ आपुलें आपुलें सैन्य मेळविलें ॥ मणिचूल पर्वतासी चालिले ॥ युध्द करावयास्तव ॥३॥
समर भूमीवरी स्वामी कार्तिक ॥ मार्तंडासि सेना दावी प्रत्येक ॥ वृषमांरुंड छत्र चंद्रासारिखे पताक ॥ बंदीजन गर्जती ते शंभुसेना ॥४॥
मयुर वाहन शक्ति कुंतादि आयुध ॥ नीलवर्ण कवच हे माझी सेना प्रसिध्द ॥ ऐरावतारुढ छत्र वज्र आयुध ॥ गज तुरंग सेना शक्राची ॥५॥
शक्तिशस्त्र मेषवाहन सेना अग्निची ॥ सहिषवाहन दंड आयुध यमसेना साची ॥ खड्ग आयुध राक्षस सेना नैऋत्याची ॥ पाशहस्ताची वरुणध्वज ॥६॥
सुवर्णालंकृत कुबेर सैन्य ॥ मुखाकृती गज उंदीरवाहन ॥ फरश अंकुश आयुध जाण ॥ हे सेना गणपतीची ॥७॥
मृगमुख अश्वछत्र शुभ्र चंद्रसैन्य ॥ सप्तमुख अश्वरथ सूर्यछत्रसुवर्ण ॥ शुभ्रतुरंग गज कमंडलु आयुध जाण ॥ हे सेना ब्रह्मदेवाची ॥८॥
शंख चक्रादि आयुध गरुडवाहन ॥ पिवळे छत्र मेघवर्ण ॥ मकर कुंडल सुहास्य वदन ॥ हे सेना विष्णुची ॥९॥
शूलतोमर खड्गबाण ॥ मुसळ खट्वांग धनुष्यासन ॥ अष्ट आयुध गजचर्म वसन ॥ ऐसी सेना त्रिनयनाची ॥१०॥
शाकिनी डाकिनी समस्त ॥ वेताळदिभूतप्रेत ॥ लांब ओठ दीर्घ दांत ॥ कपाळावरी डोळ्याचे ॥११॥
चार तीन कानाचे ॥ पंचसप्तदशओंठाचे ॥ नऊ सात तीन जिव्हाचे ॥ सात तीन सहा डोई ॥१२॥
जिव्हा लांब दीर्घ नाक ॥ विशाळ नासिक विक्राळ वदन ॥ नानारुप विलक्षण ॥ सेना चालिली मणिचूल पर्वतीं ॥१३॥
परोपरीची वाद्यें वाजत ॥ भिडती रथादि समस्त ॥ भूमीवरी उतरलीं सेनाजात ॥ मल्लासवें युध्द करावया ॥१४॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१५॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां शिवसैन्यवर्णनो नाम अष्टमोऽध्याय गोड हा ॥८॥