स्वप्न शास्त्रानुसार या प्रकारचे स्वप्न येणे शुभ मानले जातात
स्वप्न बघणे तसे तर सामान्य बाब आहे, पण ज्योतिषशास्त्रात स्वप्न बघण्याचे फार महत्त्व आहे. जे स्वप्न आम्ही उघड्या डोळ्याने बघतो त्यांना पूर्ण करण्यासाठी आम्ही फार मेहनत करतो पण जे स्वप्न आम्ही झोपेत बघतो त्यावर आमचे कुठले ही नियंत्रण नसते. आज आम्ही त्या स्वप्नांबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो.
स्वप्नात स्वतःचे किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचे मृत्यू होताना बघत असाल तर ते फारच शुभ मानले जाते. याचा संबंध वयाशी असतो. असे म्हटले जाते की ज्याची तुम्ही मृत्यू बघितली आहे त्याचे वय वाढते.
जर तुम्ही स्वप्नात फूल बघता तर याचा अर्थ असा की तुमच्या जीवनात काही नवीन आणि चांगले होणार आहे. अपुरी इच्छा पूर्ण होऊ शकते.
स्वप्नात साप बघितल्याने धन दौलतमध्ये वृद्धी होते, तसेच सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता असते. स्वप्नात स्वत:ला स्मशानात बघणे देखील फार शुभ मानले जाते, हे तुमच्या प्रगतीचे सूचक आहे. तुम्हाला जीवनात मान सन्मान मिळू शकतो. तुम्ही जर स्वत:ला निर्धन बघितले तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर लवकरच धन वर्षा होऊ शकते.