सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (13:06 IST)

वैकुंठ चतुदर्शी महत्त्व, पूजा विधी

त्रिपुरारी पौर्णिमेचा आधी येणारी कार्तिक चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. 
 
चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात, असे म्हटलं जातं. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते. 
 
या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. या दिवशी विष्णूंची सहस्त्र कमळांनी पूजा करणार्‍याला कुटुंबाला वैकुंठ प्राप्ती होते असे म्हणतात. 
 
महाभारत काळात श्रीकृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुदर्शीला केले होते. म्हणूनच या दिवशी तरपण आणि श्राण करणे श्रेष्ठ असल्याचे मानले जातं. सद्धगुणी, दिव्य पुरुष आणि सतकर्म करणार्‍यांना वैकुंठ प्राप्ती होते. तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास वैकुंठात स्थान मिळण्याची शक्यता वाढते. 
 
वैकुंठ चतुर्दशी महत्त्व -
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान विष्णु यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णुची परिक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णु यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णुची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णुला वर दिला की, कार्तिक मासनंतर येणारी चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. 
 
या दिवशी भगवान विष्णुची पुजा केली जाते. विष्णुला चंदन, फुलं, दुध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णुचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णु नामस्मरण केलं जातं. विष्णुला गोड नैवद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णुंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
 
पुराणानुसार या दिवशी शिवने प्रभू विष्णुंना सुदर्शन चक्र दिले होते. या दिवशी शिव-विष्णु एकाएक रुपात असतात.
 
शुभ मुहूर्त
यंदा 28 नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे.
 
तिथी आरंभ- 28 नोव्हेंबर रात्री 10 वाजून 22 मिनिटापासून
तिथी समापन- 29 नोव्हेंबर 12 वाजून 48 मिनिटापर्यंत
निशिथ काल- रात्री 11 वाजून 39 मिनिटापासून ते 12 वाजून 32 मिनिटापर्यंत