1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2017 (10:30 IST)

सुरू झाले पंचक, जाणून घ्या कोणत्या नक्षत्रात काय प्रभाव पडेल...

25 एप्रिलपर्यंत राहणार आहे पंचक, या दरम्यान सावधगिरी बाळगा...   
ज्योतिष्यामध्ये पंचकाला शुभ नक्षत्र नाही मानले जाते. या  याला अशुभ आणि हानिकारक नक्षत्रांचा योग मानला जातो. नक्षत्रांच्या या संयोगाने बनणार्‍या या विशेष योगाला पंचक असे म्हटले जाते. याच्या अंतर्गत धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद व रेवती नक्षत्र येतात.  
 
प्राचीन ज्योतिषात खास करून असे मानण्यात येते की पंचकात काही विशेष कार्य वर्जित असतात. जेव्हा चंद्र, कुंभ आणि मीन राशीत असतो त्या वेळेला पंचक म्हणतात. 21 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10.02 मिनिटाने पंचक सुरू झाला आहे. जे 25 एप्रिल मंगळवारच्या रात्री 8.48 मिनिटापर्यंत राहणार आहे.  
 
जाणून  घेऊ काय असतो पंचकाचा प्रभाव :
 
धनिष्ठापासून रेवतीपर्यंत जे पाच नक्षत्र असतात, त्यांना पंचक म्हणतात आणि त्यांचा प्रभाव प्रत्येक मनुष्यावर पडतो. म्हणून या दरम्यान सावधगिरी बाळगणे फारच गरजेचे आहे.  
 
* पंचकाच्या प्रभावामुळे धनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय राहतो. 
* शतभिषा नक्षत्रात विवादाचे योग निर्माण होतात. 
* पूर्वाभाद्रपद रोग कारक नक्षत्र असतो.  
* उत्तराभाद्रपदात धनाच्या स्वरूपात दंड मिळतो.    
* रेवती नक्षत्रात धन हानी होण्याची शक्यता असते.