1977 मधील जनता लाट

1977 loksabha election
Last Modified सोमवार, 12 मे 2014 (15:37 IST)
आणीबाणीमुळे इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात जबरदस्त वातावरण तयार झाले होते. याचा प्रत्यय 1977 च्या लोकसभा निवडणुकीत आला. केवळ जनता पक्षाच्या नावावर अनेक उमेदवार निवडून आले. त्यावेळच्या जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी यांना 1977 मध्ये ठाणे मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. पुण्यातून समाजवादी पक्षाचे मोहन धारिया यांना जनता पक्षाची उमेदवारी मिळाली. रामभाऊ म्हाळगी हे पुण्याचे. 1971 मध्ये त्यांनी पुण्यातूनच लोकसभेची निवडणूक लढवली होती. म्हाळगी यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, असा आग्रह त्यावेळच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षाच्या नेतृत्त्वाकडे धरला. त्यामुळे म्हाळगी यांना ठाण्यातून उमेदवारी दिली गेली.
त्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या विरोधात एवढी प्रखर लाट होती की स्थानिक आणि उपरा उमेदवार अशी तुलना करण्याचेही मतदारांच्या मनात आले नव्हते. रामभाऊ म्हाळगी हे ठाणेकरांना अपरिचित होते; तरीही त्या निवडणुकीत ते प्रचंड मतांनी लोकसभेवर निवडून गेले. याच निवडणुकीत जॉर्ज फर्नाडिस हे बिहारमधील समस्तीपूर मतदारसंघातून निवडून आले. विशेष म्हणजे जॉर्ज फर्नाडिस हे निवडणुकीवेळी तुरुंगात होते. त्याआधीच्या 67 आणि 71 अशा दोन लोकसभा निवडणुका जॉर्ज फर्नाडिस यांनी मुंबईतून लढवल्या होत्या. बिहारशी तसा फर्नाडिसांचा काहीच संबंध नव्हता. मात्र आणीबाणीविरोधी लाटेत फर्नाडिस हे संपूर्ण देशातून विक्रमी मतांनी लोकसभेवर निवडून आले.

- आशिष जोशी


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

तामिळनाडूमधील नोकियाच्या ४२ कर्मचाऱ्यांना कोरोना,प्लान्ट

तामिळनाडूमधील नोकियाच्या ४२ कर्मचाऱ्यांना कोरोना,प्लान्ट बंद
तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदूर येथील मोबाईल बनवणाऱ्या प्रसिद्ध नोकिया कंपनीच्या ...

आदिवासी बांधवांना दिलासा, वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात ...

आदिवासी बांधवांना दिलासा, वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांची अधिसूचना जारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनुसुचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची ...

LIC ने सादर केली संशोधित PMVVY योजना, बदल जाणून घ्या

LIC ने सादर केली संशोधित PMVVY योजना, बदल जाणून घ्या
भारतीय जीवन महामंडळाने LIC ने संशोधित पंतप्रधान वय वंदन योजना (PMVVY) सादर केली. या ...

उध्दव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी अशी दिली आश्वासने

उध्दव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी अशी दिली आश्वासने
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना फोन करून सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान ...

करोना चाचणीच्या शुल्काबद्दल धोरण ठरवा

करोना चाचणीच्या शुल्काबद्दल धोरण ठरवा
करोनाचं निदान करणाऱ्या आरटी-पीसीार (the real-time polymerase chain reaction) चाचणीसाठी ...