Holika Dahan Shubh Muhurat 2023 होळी हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन करण्याची परंपरा आहे. यंदा होळीचा हा पवित्र सण 7 आणि 8 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. म्हणजेच 7 मार्चला होलिका दहन आणि 8 मार्चला धुलेंडी साजरी केली जाणार आहे. होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की होलिका दहनाच्या अग्नीत आहुती देण्याने जीवनातील नकारात्मकता संपते. यासोबतच कुटुंबात सुख-शांती राहते. तर चला होलिका दहनाची पूजा पद्धत, मंत्र आणि महत्त्व जाणून घेऊया…
होलिका दहन पूजा साहित्य
पाण्याची एक वाटी, शेणाच्या माळा, रोळी, अक्षत, उदबत्ती आणि धूप, फुले, कच्चा कापसाचा दोरा, हळदीचा तुकडा, मूग डाळ, बताशा, गुलाल, नारळ, नवीन धान्य.
होलिका दहन पूजन विधी
होलिका दहनाच्या रात्री होलिका आणि भक्त प्रल्हाद यांची पूजा केली जाते.
या दिवशी सर्वप्रथम आद्य उपासक श्रीगणेशाचे स्मरण करुन ज्या ठिकाणी पूजा करायची आहे त्या ठिकाणी गंगेचे पाणी शिंपडून शुद्ध करावे.
होलिका दहनाचे साहित्य आग्नेय दिशेला ठेवावे.
पूजा करताना पूजकाने होलिकाजवळ पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे.
पूजेसाठी तांब्याच्या भांड्यात पाणी, हार, रोळी, तांदूळ, गंध, फुले, कच्चा कापूस, बताशे-गूळ, अख्खी हळद, गुलाल, नारळ इत्यादींचा वापर करावा.
यानंतर होलिकेत शेणापासून बनवलेली खेळणी आणि हार ठेवावा.
यासोबतच नवीन पिकाचे धान्य ठेवावे.
नंतर कच्चा सूत होलिकाभोवती तीन किंवा सात वेळा गुंडाळावा.
यानंतर 'असृक्पाभयसंत्रस्तै: कृता त्वं होलि बालिशै:। अतस्त्वां पूजायिष्यामि भूते भूतिप्रदा भव।।' असा उच्चार करत होलिकेच्या सात प्रदशिक्षा घालाव्या.
या मंत्रासोबत होलिका अर्घ्य ही द्यावे.
चौकात होलिका दहन झाल्यानंतर तेथून आणलेल्या अग्नीने होलिका दहन करावे.
नंतर मडक्यातील शुद्ध पाणी आणि इतर सर्व पूजेच्या वस्तू एक एक करून होलिकाला भक्तीभावाने अर्पण कराव्या.
होलिका पूजन केल्याने कुटुंबातील सदस्यांना आजारांपासून मुक्ती मिळते, चांगलं आरोग्य लाभतं, असे मानले जाते.
होलिका दहन 2023 शुभ मुहूर्त
पंचांगानुसार 7 मार्च रोजी होलिका दहन मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांपासून ते 8 वाजून 51 मिनिटापर्यंत आहे. एकूण वेळ 2 तास 27 मिनिट आहे.