सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Updated : मंगळवार, 19 मार्च 2024 (11:21 IST)

Holi 2024: धुलिवंदनमध्ये लहान मुलांची घ्या खास काळजी

holi rang
या वर्षी होळी 25 मार्चला आहे. होळी रंग, आनंद आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याचा सण आहे. या पर्वाला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक उत्साहात असतात. लहान मुले तर रंगांना घेऊन खूप उत्साहित असतात. धुलिवंदनाच्या दिवशी लहान मुले रंग घेऊन घराबाहेर खेळायला जातात. 
 
लहान मुलांमधील हा उत्साह पाहून पालक देखील आनंदित होतात. पण होळी तसेच धुलिवंदनच्या दिवशी एखादा बेजवाबदारपणा घात करून जातो.या उत्साहात जर तुम्ही मुलांकडे लक्ष देत नसाल तर अपघात देखील घडू शकतो. म्हणूनच होळी तसेच धूलिवंदन आणि रंगपंचमीला लहान मुलांकडे विशेष लक्ष द्या. सोबतच सावधानी बाळगा.  
 
केमिकलयुक्त रंगाचा वापर टाळा-  
आजकल ज्या रंगांचा उपयोग होतो ते केमिकल युक्त असतात. बाजारात केमिकल युक्त रंग मिळतात जे त्वचा आणि डोळ्यांना नुकसान करतात. म्हणूनच रंगांची ओळख करून ऑर्गेनिक रंग आणावे. लहान मुलांना केमिकलच्या रंगांपासून वाचवण्याकरिता त्यांना गॉगल्स घालावे म्हणजे त्यांचे डोळे सुरक्षित राहण्यास मदत होईल. तसेच फूल स्लिवलेस असलेले कपडे घालावे म्हणजे त्वचा झाकलेली राहिल आणि रंगांच्या संपर्कात येण्याची संभावना कमी राहिल. 
 
रंगांच्या फुग्यांपासून दूर रहा- 
धुलिवंदनला लहान मुले नवीन पिचकारीची मागणी करतात. पिचकारी फक्त रंग खेळण्यासाठी असावी. तसेच याशिवाय लहान मुले फुग्यांमध्ये रंगाचे पाणी भरून ते खेळतात. तसेच एकमेकांवर ते फूगे मारतात. जे फुटताना दुखापत करू शकतात. याकरिता रंग खेळतांना फुग्यांचा वापर टाळा. 
 
आहाराकडे विशेष लक्ष द्यावे- 
रंगच नाही तर तळलेले, भाजलेले पदार्थ जास्त गोड पदार्थ आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ हे मुलांचे पाचनतंत्र बिघडवू शकतात. फूड पॉइजनिंगची समस्या येऊ शकते. याकरिता धुलिवंदनाला लहान मुलांचे आरोग्य धोक्यात यायला नको म्हणून त्यांच्या आहारकडे विशेष लक्ष द्या. 
 
नजर ठेवा-  
तुमची मुले रंग खेळण्यासाठी बाहेर पडत असतांना तुम्ही व्यस्त राहु नका त्यांना मित्रांसोबत रंग खेळायला एकट सोडू नका तर लक्ष ठेवा. मध्ये मध्ये लक्ष द्या की तुमची मुले कोणासोबत आणि कुठे रंग खेळत आहे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik