रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. स्वातंत्र्य दिन
Written By वेबदुनिया|

'मनसे' प्रांतवाद करत नाहीः नितिन सरदेसाई

'मनसे'ने आपले आंदोलन कधीही उग्र केलेले नाही किंवा आम्ही सौम्य आंदोलन करतो असे कोणीही म्हणू शकणार नाही. परंतु, नेहमीच आमच्याकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. आज घडीला देशात शंभर प्रश्न, समस्या आहेत, त्यातील 10 प्रश्नांना आम्ही हात घातला आहे. जर उद्या आम्ही प्रांतीयतेचा मुद्दा सोडला तर आमच्यावर पुन्हा आरोप होतील की आम्ही प्रांताकडे, प्रदेशाकडे लक्षच देत नाही.

आम्हाला फक्त सामान्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रांतवाद करत नाहीत, मराठी माणसांचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडवण्‍याला जर आपण प्रांतवाद म्हणत असाल तर तोही आम्हाला मान्य आहे. देश अखंड आहे, तो अखंडच रहाणार. मनसेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
( श्री. सरदेसाई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आहेत.)

(शब्दांकनः नितिन फलटणकर)