मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. युद्धाचे ढग
Written By वेबदुनिया|

आता आलीय उत्तर देण्याची वेळ

संदीपसिंह सिसोदिया

WD
खरे तर वाढता आंतरराष्ट्रीय दवाब तसेच देशात आपली पाळेमुळे घट्ट रोवणारे दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटनांच्या विरोधात कारवाई होण्याची गरज असताना पाकिस्तान ते न करता उगाचच आक्रमक आणि भडक वक्तव्ये करून युध्दाला पोषक परिस्थिती निर्माण करत आहे.

आपला शब्द पाळला नाह
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी जानेवारी 2004 मध्ये तर आसिफ अली यांनी सप्टेंबर 2008 मध्ये
आपल्या नियंत्रण रेषेचा वापर दहशतवाद्यांना कदापि करू न देण्याचे वचन भारताला दिले होते. पण, ज्या देशाच्या दोर्‍या लष्कर आणि आयएसआयच्या हातात आहे ते आपल्या हातात सत्ता राखण्यासाठी काहीही करू शकतात हे विसरता येणार नाही. त्यामुळे या सगळ्यांना धुडकावून लावत अतिरेकी कारवाया सुरूच राहिल्या.

सरकारवर प्रचंड दबाव
संसदेवर 200२ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारताने नियंत्रण रेषेवर सैनिकही तैनात केले होते. मात्र, अमेरिकेच्या दबावापुढे आपल्याला झुकते घ्यावे लागले. त्यामुळे लोकांमध्ये 'एनडीए' सरकारविरोधात वातावरण निर्माण झाले होते. आताही लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. सामान्यांकडून युद्धासाठी प्रचंड दबाव असला तरी निवडणुका तोंडावर असल्याने सरकारलाही कोणतेही पाऊल सांभाळूनच टाकावे लागणार आहे.

युद्धामुळे फायदा कुणाचा
भारतीय उपखंडात पुन्हा एकदा युद्ध पेटले तर शस्त्रांच्या मागणीत प्रचंड वाढ होईल आणि या उद्योगाला चालना मिळेल. आर्थिक मंदीमुळे घाबरलेल्या अमेरिकेलाच या युद्धापासून फायदा होणार आहे. भारत-पाक युद्धामुळे त्यांच्या मंदीत आलेल्या शस्त्र उद्योगाला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात. रशिया, ब्राझील, चीन, फ्रान्स आणि इस्त्राइलही याचा लाभ उठवू शकतात. कारण हे सगळे बडे शस्त्रपुरवठादार देश आहेत.

इतिहासाची पाने चाळल्यास असे लक्षात येईल की, 1930 च्या युद्धानंतर आलेल्या मंदीत असेच झाले होते आणि दुसर्‍या महायुद्धा दरम्यान उत्पादन वाढल्याने अनेक उद्योगांना चालना मिळाली होती. एवढेच नव्हे तर कॉम्प्युटर, प्लास्टिकसारख्या उद्योगांचा विकास झाला. व्यापार वाढल्याने कोट्यवधी लोकांच्या हाताला काम मिळाले. परिणामी मंदी हटली.

अणवस्त्रांचा धोका
पण यावेळचे युद्ध थोडे वेगळे असेल. दोन अण्वस्त्र सज्ज देशांमध्ये हे युध्द होणार असल्याने हे केवळ दोन देशांसाठीच नव्हे जगासाठी धोकादायक ठरणार आहे. अणवस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे दोघांनी जाहीर केले असले तरी पराभवाच्या ‍परिस्थितीत अथवा फसवणूक करून पाकिस्तान कट्टरपंथीयांकडून अणवस्त्रांचा वापर घडवून आणू शकतो. कट्टरपंथीयांना अणवस्त्रांवर कब्जा करण्‍याचे घडवून आणून भारत, अफगानिस्तानबरोबरच अमेरिका आणि नाटोच्या सैनिक छावण्यांवर या शस्त्रांचा मारा केला जाऊ शकतो.

केवळ दहशतवाद्यांवर कारवा
अमेरिकेकडून होणार्‍या वाढत्या दबावामुळे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करण्याची परवानगी पाकिस्तान भारताला देऊ शकते. याचबरोबर अफगानिस्तान तालिबानींविरूध्द चाललेल्या कारवाईतील अमेरिकन सैनिक या निमित्ताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर हल्ला करू शकतात.

आंतराष्ट्रीय समर्थ
आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी भारत पाकिस्तानवर कारवाईचे पाऊल उचलू शकतो असे रशिया आणि अमेरिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. याचबरोचर अने‍क देशांचे समर्थनही मिळलेले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्यांमध्ये अनेक परदेशी नागरिकांचाही बळी गेला आहे. त्यामुळे सबंधित देशही कमालीचे संतापलेले आहे‍त आणि त्यांनीही दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्यासाठी भारताला पाठबळ देण्‍याची घोषणा केली आहे. भारताचा शत्रू मानला जात असला तरी चीनदेखील दहशवाद्यांमुळे त्रस्त आहे. त्यामुळे चीनही विरोध करणार नाही.

सैनिक तैनात
अमेरिकेच्या गुप्तचर एजन्सीचा अहवाल खरा मानला तर भारताने गेल्या एक महिन्यापासूनच युद्धाची तयारी सुरू केली आहे. नौदल, हवाईदल व पायदळ तैनात करण्‍यात आले आहे. अधिका-यांचा आदेश मिळताच पुढील कारवाईला सुरूवात होईल, असे सांगण्‍यात येते आहे.

पाकिस्तानच्या सीमेबरोबरच आतमध्येही दहशतवादी शिबिरे सुरू आहेत. पेशावर, कराचीजवळ दहशतवाद्यांवर हल्ला करायचा झाल्यास हवाई हल्ल्याशिवाय पर्यायच उरत नाही. भारताला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नियोजन करावे लागेल.