पाकचे कदमताल सुरूच

बुधवार,डिसेंबर 31, 2008
इस्लामाबाद- भारत पाकवर हल्ला करणार या धास्तीने आणि मुंबई हल्ल्यांवरील लक्ष इतरत्र केंद्रित होण्यासाठी पाकने भारतीय सीमेवर सुरू केलेल्या नाटकाचा पहिला अंक पाकनेच संपवला आहे.
पॉंडेचेरी- पाकने नाहक युद्धस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भारताला पाकवर सैन्य कारवाई करण्याची मुळीच इच्छा नाही, परंतु पाकने जर भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास पाकशी दोन हात करण्यास भारत तयार असल्याचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी ...
इस्लामाबाद वाढता आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताने केलेली लष्करी कारवाईची तयारी यामुळे भयभीत झालेल्या पाकिस्तानचा भारतविरोधी सूर काहीसा मवाळ झाला आहे. भारताबरोबर आम्हाला कोणत्याही प्रकारचा लष्करी संघर्ष नकोय, असे म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा ...
मुंबई हल्‍ल्‍यानंतर भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात निर्माण झालेल्‍या तणावाचा परिणाम अटारी-वाघा या दोन्‍ही देशांच्‍या सीमेवरही पहायला मिळाला आहे. रोज सायंकाळी सीमेवर दोन्‍ही बाजूने सैनिक समोरा-समोर येऊन देशाचा ध्‍वज उतरवित असतात. यावेळी दोन्‍ही ...
भारताने सीमेवर सैन्‍य आणलेले नाही. सैन्‍य कारवाई करण्‍याची सध्‍यातरी भारताची इच्‍छा नाही मात्र पाकिस्‍तानने आपल्‍या भूमीवरून चालत असलेला दहशतवाद थांबवून दहशतवादी अड्डे उध्‍दस्‍त करावेत, असा इशारा परराष्‍ट्र मंत्रालयाने दिला आहे.
पाकिस्तानातील संपन्न प्रांत असलेल्या पंजाबातून अनेक तरूण आज अजमलच्या मार्गावर चालत आहेत. पाकिस्तानचे भवितव्य दहशतवादाकडे वळालेल्या याच तरूणांच्या हाती आहे.
इस्लामाबाद आपल्याच भूमीत थारा दिलेल्या दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई करण्यास अनुत्सुक असलेल्या पाकिस्तानने आता या प्रश्नावरून भारताशी निर्माण झालेला तणाव निवळावा यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मध्यस्थीसाठी धाव घेतली आहे.
लाहोर बंदी घालण्यात आलेल्या जमात उद दवा या संघटनेतर्फे चालविल्या जाणार्‍या काही शाळांत 'जिहाद'ची शिकवण दिली जाते, अशी उपरती आता पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला झाली आहे.
इस्लामाबाद कराचीतील लाल मशिदीत काही महिन्यांपूर्वीच मुशर्रफ यांच्या सरकारने कारवाई करून मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला होता. यातील काही शस्त्रे चोरीला गेल्याचे नंतर उघडकीस आले होते. हीच शस्त्रे मुंबईवरील हल्ल्यात वापरली गेली असावीत, असे एक मत पुढे येत ...
पाकिस्तानमध्‍ये भडकलेल्‍या हिंसक घटनांमध्‍ये तेथील प्रसार माध्‍यमांनी भारतीय नागरिकांना दोषी ठरविण्‍यास सुरूवात केल्‍याने भारतीय परराष्‍ट्र मंत्रालयाने शुक्रवारी आपल्‍या नागरिकांना पाकिस्तानात न जाण्‍याचा सल्‍ला दिला आहे.
भारत-पाकिस्‍तान सीमेवर असलेले गाव खाली करण्‍याचे आदेश अद्याप दिले गेले नसल्‍याचे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) स्‍पष्‍ट केले आहे. बीएसएफचे महानिर्देशक एम. एल. कुमावत यांनी सांगितले, की सीमेवर स्थिती सामान्‍य असून बीएसएफ कोणत्याही परिस्थितीचा सामना ...
भारताची जमिनी सीमा 17 राज्य आणि 92 जिल्ह्यातून जाते. सीमेची लांबी 14,880 किमी आहे.
भारताने पाकिस्तानला त्यांच्या अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर कारवाई करण्याचे सांगितले आहे. परंतु, पाकिस्तान त्यासाठी तयार नाही. यासंदर्भात राजनैतिक स्तरावर सुरू असलेले यु्द्ध शेवटच्या टप्प्यात आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसंदिवस बिघडत आहेत. पाककडून दहशतवाद्यांवर कारवाई होत नसल्याने भारताची सहनशीलता संपत आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर भारताने कारवाई केल्यास संपूर्ण पाकिस्तानावरच कारवाई करावी लागणार आहे.

पाकिस्तानची ताकद

बुधवार,डिसेंबर 31, 2008
हत्फ -1, 1 ए या क्षेपणास्त्राचा पल्ला फारसा नाही. केवळ 500 किलोमीटर दारुगोळा समाविष्ट होण्याची ताकद त्यात आहे. मारक क्षमता 80 ते 100 किलोमीटर आहे.

भारताची ताकद

बुधवार,डिसेंबर 31, 2008
हवेतून हवेत मारा करणार्‍या आणि 110 किलोमीटरपर्यंत मजल असलेल्या अस्त्र क्षेपणास्त्राची भारताने 13 सप्टेंबर 2008 ला ओरिसाच्या चांदीपूर येथे यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र 15 किलोग्रॅमपर्यंतची युद्ध सामग्री आपल्यासोबत नेऊ शकते.
मुंबई हल्ल्याला महिना पूर्ण झाला आहे आणि पाकिस्तानने त्यांच्या भूमीत राहून कारवाया करणार्‍या दहशतवाद्यांविरूद्ध काहीच कारवाई केलेली नाही. आता भारताने पाकिस्तानविरूध्द कठोर पावले उचलत पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी चालवली आहे. ...
इस्लामाबाद दहशतवादांविरोधात लढाईची भाषा करणारा पाकिस्तान दुतोंडी असल्याचेच आता स्पष्ट होत आहे. दहशतवादविरोधी लढाईत अमेरिकेला साथ देणार्‍या पाकिस्तानने आता तालिबानी अतिरेक्यांविरोधातील लक्ष कमी केले असून सारी ताकद भारतीय सीमेवर लावली आहे.
पाकिस्तानातून कारवाया करणारी लष्कर ए तोयबा आता आपला 'बेस' वाढविण्याच्या प्रयत्नात गुंतली आहे. त्यासाठी युवकांची मोठ्या प्रमाणात भरती केली जात असून हे युवकही उच्चशिक्षित आहेत.
इस्लामाबाद भारताविरूद्ध युद्ध झाल्यास पाकिस्तानी सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचे तालिबानी अतिरेक्यांनी जाहीर केल्यानंतर आता उलेमांनीही त्यांच्या सूरात सूर मिसळला आहे. भारताने युद्ध लादल्यास आम्ही तुमच्या पाठिशी असून असे त्यांना पाकिस्तानी ...