मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. युद्धाचे ढग
Written By नई दुनिया|

भारतीय सीमा आहेत तरी कशा?

* भारताची जमिनी सीमा 17 राज्य आणि 92 जिल्ह्यातून जाते. सीमेची लांबी 14,880 किमी आहे.

* समुद्री सीमा 5,422 किमी लांब आहे. 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून ही सीमा जाते. भारताच्या सीमेमध्ये 1,197 बेटे आहेत. त्याची समुद्री सीमा 2094 किमी आहे.

* मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड, दिल्ली आणि हरियाणा ही राज्ये सोडून बाकी सर्व राज्यातून एकपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सीमा आहेत.

आतापर्यंतची उपाययोजना:
भारताची जमिनी व सागरी सीमा प्रचंड मोठी आहे. या सीमेच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याबाबत आतापर्यंत केलेले प्रयत्न:

*बांग्लादेशाच्या सीमेवर विद्युत तार आणि थर्मल इमेजिंग सिस्टम लावण्यात आले आहे. यानंतर बांग्लादेशमधून मोठ्या संख्येने घुसखोरी होते.

* राजस्थानमधील पाकिस्तानी सीमेवर काटेरी कुंपण आहे. परंतु, इतक्या मोठ्या सीमेची सुरक्षा करणे खूपच अवघड आहे.

* समुद्री सीमेच्या संरक्षणासाठी कोस्टल गार्ड आणि नौदल आहे. परंतु, नौदलाबरोबर कोस्टल गार्ड्‌सकडेही पुरेशी लष्करी सामग्री नाही. यामुळेच इतक्या मोठ्या समुद्री सीमेचे संरक्षण करणे कठीण जाते.