Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:48 IST)
भारत सीमेवर सैन्य तैनात करणार नाही
भारताने सीमेवर सैन्य आणलेले नाही. सैन्य कारवाई करण्याची सध्यातरी भारताची इच्छा नाही मात्र पाकिस्तानने आपल्या भूमीवरून चालत असलेला दहशतवाद थांबवून दहशतवादी अड्डे उध्दस्त करावेत, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.
भारताने स्पष्अ केले आहे, की आम्हाला युध्द नको आहे. मात्र पाकिस्तानने मुंबई हल्ल्याशी संबंधीत लश्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दवा विरोधात कारवाई करावी. भारताचे उच्चायुक्त सत्यब्रत पॉल यांनी पाकिस्तान विदेश सचिव सलमान बशीर यांच्या भेटी दरम्यान हे स्पष्ट केले आहे, की आम्हाला युध्द नको आहे. मात्र कारवाई त्वरित केली जाणे आवश्यक आहे.