Last Modified: पॉंडेचेरी , बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:49 IST)
.... तर भारतही हल्ल्यांना तयार
पाकने नाहक युद्धस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भारताला पाकवर सैन्य कारवाई करण्याची मुळीच इच्छा नाही, परंतु पाकने जर भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास पाकशी दोन हात करण्यास भारत तयार असल्याचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे.
पॉंडेचेरीत विद्यापीठाच्या कार्यक्रमात गृहमंत्री बोलत होते. पाक वाट भरकटलेले राष्ट्र बनले आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताने पाकला वठणीवर आणण्याची विनंती केली आहे. पाकवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्यात भारताला यश आले असून, यानंतरही पाकने आपले नापाक इरादे कायम ठेवल्यास पाकचा योग्य बंदोबस्त करण्यास भारत तयार असल्याचे चिदंबरम म्हणाले.