'त्यांना' करायची होती राजीव गांधींची हत्या
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा कट खलिस्तानी आणि काश्मिरी दहशतवाद्यांनी 1985 सालीच रचला होता. राजीवजी या दरम्यान ब्रिटन दौऱ्यावर असतानाच त्यांची हत्या करण्यात येणार होती, परंतु भारतीय गुप्तचर संस्थेतील एम-15 ला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा डाव हाणून पाडल्याचा खुलासा कॅब्रिज विद्यापीठातील एका प्राध्यापकाने केला आहे. प्राध्यापक ख्रिस्तोफर एण्ड्रू यांनी आपल्या 'द डिफेंस ऑफ द रिल्म' या पुस्तकात हा दावा केला आहे. खलिस्तानी आणि काश्मिरी दहशतवाद्यांनी हा कट रचल्याचे त्यांनी यात स्पष्ट केले आहे.