1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: जोहन्सबर्ग , मंगळवार, 18 मार्च 2014 (16:01 IST)

दक्षिण आफ्रिकेत मुसळधार; 32 ठार

दक्षिण आफ्रिकेच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु असून अनेक नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांना पुराने वेढा  दिल्याने आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारी सुत्रांनी सां‍गितले. नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली असून जनजीवन पूर्णपणे ठप्प झाला आहे. सुमारे तीन हजार नागरिक बेपत्ता असल्याची माहिती पारंपरिक मंत्री ऐन्डाइज नेल यांनी दिली. 
 
संतंतधार पावसामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहे. विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे  काम सुरु आहे. वीज पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समजते. पाण्यामुळे विविध भागातील रस्ते आणि पुलाचे मोठे नुकसान  झाले आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.