शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2024 (10:01 IST)

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

रशिया आणि युक्रेनमध्ये 26 महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. सध्या तरी हे युद्ध संपताना दिसत नाही. दरम्यान, रशियाकडून पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओडेसा या ब्लॅक सी पोर्ट सिटीमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान पाच जण ठार झाले. तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात अनेक निवासी इमारतींसह नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.
 
अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, याआधी रशियाच्या सीमेपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या युक्रेनच्या खार्किव शहरावर ग्लाइड बॉम्बने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले. या हल्ल्यात एका बहुमजली निवासी इमारतीचेही नुकसान झाले आहे. युक्रेन गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ रशियन आक्रमणापासून बचाव करत आहे. रशियन सैन्य दररोज खार्किव आणि ओडेसा या प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा करत आहे.
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्कंदर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हा हल्ला करण्यात आला. प्रॉसिक्युटर जनरल आंद्रे कोस्टिन यांनी सांगितले की, क्षेपणास्त्राचा ढिगारा आणि धातूचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, दुःखाची गोष्ट म्हणजे जखमींमध्ये दोन मुले आणि एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. 
कोस्टिनने सांगितले की सुमारे 20 निवासी इमारती आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. एका वेगळ्या घटनेत, रशियन अधिकाऱ्यांनी क्रिमियामध्ये युक्रेनने केलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला रोखण्यात यश मिळविल्याचा दावा केला आहे. 
 
Edited By- Priya Dixit