1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सिंगापूर , सोमवार, 30 मार्च 2015 (11:38 IST)

ली कुआन यांना अखेरचा निरोप

सिंगापूरचे संस्थापक नेते ली कुआन यांना हजारो जनसमुदायाने अखेरचा निरोप दिला. त्यांच्या अंत्ययात्रेवेळी मुसळधार पावसातही मोठी गर्दी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थिती लावली.
 
संसद परिसरातून निघालेली अंत्ययात्रा विद्यापीठातील कल्चरल सेंटरमध्ये आली. मुसळधार पावसातही अंत्ययात्रेच्या दुतर्फा नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.  कल्चरल सेंटर येथे ली कुआन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
यावेळी जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे, इंडोनेशियाचे जोको विडोडो व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी उपस्थिती लावली.