शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: नैरोबी , मंगळवार, 27 सप्टेंबर 2011 (13:14 IST)

नोबेल विजेत्या वंगारी मथाई यांचे निधन

शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या पहिल्या आफ्रिकी महिला वंगारी मथाई यांचे काल कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. विज्ञान आणि सामाजिक चळवळीमध्ये हीरीरीने काम केलेल्या मथाई यांना सन 2004चा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

मथाई यांनी पर्यावरण रक्षणासाठी सुरू केलेल्या ग्रीन बेल्ट चळवळीमध्ये गेल्या 30 वर्षांत 3 कोटी वृक्षांचे रोप करण्यात आले आणि हे मोठे कार्य त्यांनी गरीब महिलांमध्ये प्रबोधन करून घडवून आणले.