शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जून 2017 (11:32 IST)

लॅरीसा यांनी संसदमध्ये केले बाळाला स्तनपान

कॅनबेरा संसदेमध्ये लॅरीसा वॉटर्स यांनी संसद सुरू असताना आपल्या बाळाला स्तनपान दिलं. संसद सुरू असताना अशा प्रकारची कृती करत लॅरीसा यांनी इतिहास रचला आहे.  अशाप्रकारचं धाडस करणारी ही देशातील पहिली महिला ठरली होती. संसदेत अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा होत असते. अनेक महत्त्वाचे निर्णय याठिकाणी घेतले जातात. यावेळी आपण हजर असणं गरजेचं आहे, पण आपल्या बाळाकडेही दुर्लक्ष व्हायला नको या हेतून त्यांनी न लाजता भर संसदेत ही गोष्ट केली.
 
ब्लॅक लंग डिसिज या आजाराबाबत लोकसभेत ठराव मंजूर करताना त्यांनी आपल्या बाळाला स्तनपान दिलं. बाळाला स्तनपान न दिल्यास होणाऱ्या या आजाराचं महत्त्व सांगत त्यांनी प्रत्यक्ष कृती करुन दाखवली आहे. आपल्या १४ आठवड्यांच्या अलिया जॉय नावाच्या बाळाला लॅरीसाने भर संसदेत दिलेल्या स्तनपानाचं संसदेत आणि देशातून खूप कौतुक झालं आहे.