बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , शुक्रवार, 21 जुलै 2017 (15:39 IST)

बागेत सेक्स करणार्‍या कपल्सचे हेलिकॉप्टरमधून केले चित्रीकरण

गार्डनमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रेम करत असलेल्या जोडप्यांचे नकळत चित्रीकरण करण्यात आल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण चक्क पोलिसांच्या हेलिकॉप्टरमधून बागेत सेक्स करत असलेल्या जोडप्याचे चित्रीकरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना इंग्लंडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी दक्षिण यॉर्कशायरमधील दोन पोलिस अधिकारी आणि दोन पायलटांविरोधात शेफिल्ड येथील क्राऊन कोर्टात सुनावरी सुरू झाली आहे. एक जोडपे वि‍वस्त्रावस्थेत बागेत सेक्स करत होते. त्यावेळी पोलिसांच्या हेलिकॉप्टरचा वापर करून त्यांचे चित्रीकरण करण्यात आले होते, अशी माहिती न्यायायलात देण्यात आली आहे. या प्रकरणी मॅथ्यू लुकास, ली वॉल्स, मॅथ्यु लुसेमोर आणि माल्कम रीव्ह यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.