गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

चार नातवंडांची आजी आहे ही ग्लॅमर्स लेडी

चार नातवंडांची आजी हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर सुरकुतलेला चेहरा, पांढरे केस आणि असं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं. पण या आजीला बघून तिला आजी हाक मारावी की नाही असे वाटू लागले.
 
इंटरनेटही पुन्हा एकदा या आजीच्या वयामुळे गोंधळलेलं आहे. या महिलेला बघून तिच्या वयाचा अंदाज बांधणे जरा कठिणच आहे. एखाद्या सिनेसृष्टीतील नायिकासारखी दिसणारी ही महिला चार मुलांची आजी आहे.
 
ऑस्ट्रेलिया येथील पर्थ येथे राहणारी या सुंदरी महिलेचे नाव कॅरोलिन हर्ट्ज असे आहे. हिचे तीन अपत्य आहेत आणि त्यांपासून चार नातवंड आहेत. ऐकून आश्चर्य वाटत असले तरी ही गोष्ट अगदी खरी आहे. या आजीचं वय सत्तराच्या घरात आहेत. 
 
आता हे बघून निश्चित सर्वांना उत्सुकता लागली की हिच्या सुंदरतेचं रहस्य आहे तरी काय. तर उत्तर आहे प्रामाणिकपणे डायट प्लान फॉलो करणे. या आजीने मागील 28 वर्षांपासून कोणत्याही रूपात साखरेचं सेवन केलेले नाही. तिने 'शुगर-फ्री कुकिंग' यावर एक पुस्तकदेखील लिहिली आहे. 
 
कॅरोलिनने सांगितले की आहार आणि वर्कआउट याप्रती सावध राहणे आवश्यक आहे. जागरूक असल्यास वयाच्या 70 व्या पायरीतही फिट राहणे कठिण नाही. तसेच तरुण दिसण्यासाठी कॅरोलिनने सर्जरी करवली असेल किंवा ती बोटॉक्स घेते असेही काही लोकांचे म्हणणे पडले.