गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (10:52 IST)

लग्नात नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

काळ कधी आणि कुठे झडप घालेल हे सांगता येत नाही. अलीकडे हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या येत आहे. सध्या तरुण लोकांना हृदयविकाराचे झटके येऊन त्यांना प्राण गमवावे लागत आहे. लोकांना चालता-बोलता हृदयविकाराचे झटके येत आहे. 
सध्या सोशल मीडियावर लग्नाच्या वेळी नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे व्हिडीओ येत आहे. लग्न समारंभात एकाएकी नवर देवाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जागीच कोसळला. लोकांना काही समजेल त्या पूर्वीच त्याला मृत्यूने गाठलं.

हे प्रकरण आहे पाकिस्तानातील सियालकोटच्या डस्का तालुक्यात एक लग्नसमारंभ सुरु असताना नवरदेव नववधू सोफ्यावर बसलेले होते. दोन्ही कुटुंब आनंदी आहे. एकाएकी त्यांच्या आनंदावर विरझन पडले आणि पुढे जे झाले त्याची कोणीही कल्पना केली नसेल. पुढे जे घडले ते पाहून सर्वाना मोठा धक्का बसला. 

परिसरात हसण्याच्या आवाज घुमत होता. नवरदेव अचानक सोफ्यावरून खाली पडला आणि बघता बघता त्याचा श्वासच थांबला. एका जण तातडीनं पुढे आला आणि नवरदेवाची चाचणी केली असता त्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

लग्नघरात शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळतातच पोलीस पोहोचली. हृदयविकाराच्या झटक्यानं नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांनी कोणत्या प्रकाराची चौकशी करण्यास पोलिसांना नकार दिल्याचे सांगितले.   
 
Edited By- Priya DIxit