रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बिजींग , शुक्रवार, 30 जून 2017 (10:36 IST)

भारताने 1962 च्या पराभवातून धडा घ्यावा : चीनची धमकी

चीनबरोबरच्या सीमा प्रश्‍न सोडवण्याच्या चर्चेसाठी भारताने सिक्कीममधील डोंगलोंगमधूनआपले सैन्य मागे घ्यावे, अशी पूर्वअट चीनने घातली आहे. चीनविरोधात 1962 साली झालेल्या युद्धामधील ऐतिहासिक पराभवातून भारतीय लष्कराने धडा घ्यावा, असा गर्भित इशाराही चीनने दिला आहे. आज चीनचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते लू कांग यांनी डोंगलोंग भागात भारतीय सैन्यानेच घुसखोरी केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली. या भागात निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी भारताने सर्वप्रथम या भागातून आपले सैन्या मागे घ्यायला हवे, असे ते म्हणाले.
 
भारतीय सैनिकांनी केलेल्या घुसखोरीबाबत चीनच्या प्रतिनिधींनी नवी दिल्ली आणि बिजींग दोन्ही ठिकाणच्या भारतीय अधिकाऱ्यांकडे गंभीर तक्रार नोंदवली आहे, असे लू म्हणाले. भारतीय सैनिकांनी घुसखोरी केलेले फोटो नंतर विदेश मंत्रालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जातील, असेही त्यांनी सांगितले.