मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2017 (10:50 IST)

स्वीडनच्या राजधानीत दहशतवादी हल्ला

स्वीडनच्या राजधानीत भरधाव ट्रक रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडत दुकानामध्ये घुसवल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. स्वीडनमधील भारतीय दूतावासापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर ही घटना घडली असून, त्यानंतर गोळीबाराचा आवाजही ऐकू आला आहे. दरम्यान  दुतावासात काम करणारे सर्व भारतीय आणि स्थानिक कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती भारतीय दुतावासाकडून देण्यात आले आहे. स्वीडनच्या पंतप्रधानांनी या घटनेमागे दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली असून, या संदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.