विजयी लय कायम राखण्याचा चेन्नई-राजस्थानचा प्रयत्न

Chennai  rajasthan royals
मुंबई| Last Modified सोमवार, 19 एप्रिल 2021 (14:40 IST)
चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स आपल्या पहिल्या विजयानंतर सोमवारी होणार्या आयपीएलच्या सामन्यात ज्यावेळी एकमेकांपुढे उभे राहतील, त्यावेळी दोन्ही संघांचा प्रयत्न आपली विजयी लय कायम राखण्याचा असेल. दोन्ही संघांनी सलामीच्या लढती गमावल्यानंतर पुनरागमन करताना दुसर्याच सामन्यात विजय नोंदविला आहे. मात्र, त्यांची प्रतिस्पर्धंना पराभूत करण्याची पध्दत वेगवेगळी होती.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने जिथे पंजाब किंग्जविरूध्द सोपा विजय नोंदविला. तिथे राजस्थानने अंतिम षटकात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत दोन गुण प्राप्त केले. त्यामुळे दोन्ही संघ आपले विजयी अभियान पुढे नेण्याबरोबरच दुसर्या
विजयासाठी प्रयत्नशील असतील.

या सामन्यात दीपक चाहरकडून धोनीला मागील सामन्यातील
कामगिरीची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा असेल. त्यासोबतच सॅम कुरेन व शार्दुल ठाकूर यांच्यासह अन्य गोलंदाजांनीही योगदान देण्याची चेन्नईला अपेक्षा आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याचा क्वारंटाइन कालावधी संपल्याने तो अंतिम अकरात सामील होऊ शकतो.
मोईन अली गोलंदाजी व फलंदाजीतही आपला प्रभाव पाडत आहे. मात्र, फाफ डु प्लेसिस आपली सर्वश्रेष्ट कामगिरी नोंदविण्यास अद्याप यशस्वी झालेला नाही. तर सुरेश रैनाच्या उपस्थितीने चेन्नईची फलंदाजी मजबूत झाली आहे. दुसरीकडे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने सुरूवातीच्या सामन्यात शतक झळकाविल्याने तो चांगल्या लयीत दिसत आहे. त्याच्याशिवाय जोस बटलर व डेव्हिड मिलेर यांचा फॉर्म स्पर्धेसाठी राजस्थानला खूपच महत्त्वाचा असेल. राजस्थानला त्यांच्या फलंदाजांकडून सांघिक कामगिरीची अपेक्षा आहे. तर अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट, युवा चेतन सकारिया, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रेहान यांना चेन्नईच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखावे लागेल. तरच दोन्ही संघांचे यष्टिरक्षकाकडे नेतृत्व असलेला सामना रोमांचक होईल.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?
श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ...

पॅट कमिन्स वडील होणार आहेत, प्रेयसीने दिली चांगली बातमी तर ...

पॅट कमिन्स वडील होणार आहेत, प्रेयसीने दिली  चांगली बातमी तर वॉर्नरची बायको म्हणाली - ही खळबळजनक बातमी आहे
कोरोनाविरूद्धच्या लढाईत लढा देऊन भारतीयांना मदत करून आपली मने जिंकणारी कोलकाता नाइट ...

BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली की ...

BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली की आयपीएल 2021 चे उर्वरित सामने भारतात होणार नाहीत
आयपीएल 2021 पुढे ढकलल्यानंतर सर्व क्रिकेट चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की या ...

भारतीय क्रिकेटपटूंना फक्त कोविशील्ड वैक्सीन घ्यावी, ...

भारतीय क्रिकेटपटूंना फक्त कोविशील्ड वैक्सीन घ्यावी, त्यामागील कारण जाणून घ्या
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2021) 14 वा सत्र अवेळी संपला. आता भारतीय खेळाडूंना पुढच्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...