बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (23:42 IST)

DC vs GT IPL 2022 :गुजरात टायटन्सने दिल्लीचा 14 धावांनी पराभव केला, सलग दुसरा सामना जिंकला

गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 चा 10 वा सामना दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी जिंकला. गुजरातचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील हा संघ आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गिलच्या 84 धावांच्या जोरावर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येसमोर दिल्लीला निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 157 धावा करता आल्या. दिल्लीकडून पंतने 43 धावांची नाबाद खेळी खेळली, तर फर्ग्युसनने सर्वाधिक चार बळी घेतले.
 
राहुल तेवतियाने शेवटच्या षटकात 9 धावा दिल्या आणि गुजरातने 14 धावांनी सामना जिंकला. गुजरातचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे.