शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

आता विजय मिळविणारच : कोहली

WD
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून पराभव पत्करल्यानंतर आता आम्ही विजय मिळविणारच, अशी स्पष्टता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली याने केली आहे.

बंगळुरू संघाला प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी एका विजयाची गरज आहे. बंगळुरू संघाने यापूर्वीच्या आठ विजयांसह 16 गुण घेतले आहेत. 13 सामन्यात त्यांची ही स्थिती होती. परंतु, चौदावा सामना मुंबई इंडियन्सविरुद्धचा व पंधरावा सामना पंजाबविरुद्धचा त्यांना गमवावा लागला. त्यामुळे, आता हा विजय त्यांना आवश्यक बनला आहे. जिंकू किंवा मरू या वृत्तीने त्यांना खेळावे लागणार आहे.

चेन्नईविरुद्ध त्यांचा शेवटचा साखळी सामना 18 मे रोजी घरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. चेन्नई संघ हा आयपीएल साखळी गुणतक्यात 22 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. चेन्नईने घरच्या मैदानावर 13 एप्रिल रोजी बंगळुरू संघाचा 4 गडी राखून पराभव केला होता. या पराभवाची परतफेड करण्याची वेळ आली आहे आणि हा सामना जिंकण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारची तयारी करावी लागेल, असे तो म्हणाला. ख्रिस गेल (77) आणि कोहली (57) या दोघांनी दुसर्‍या जोडीस 137 धावांची भागीदारी करून बंगळुरू संघाला मजबूत अशी 5 बाद 174 अशी धावसंख्या करून दिली होती. तरीही, पंजाबने गिलख्रिस्ट आणि महामूद यांच्या जोरावर बंगळुरूला नमविले होते. शेवटच्या टप्प्यात आमच्या गोलंदाजांनी निंयत्रित मारा केल्या नाही व जास्तीत जास्त धावा दिल्या. यापुढे, मात्र चेन्नईविरुद्ध कोणतही परिस्थितीत विजय मिळवू, अशी खात्री त्याने व्यक्त केली.