शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 21 मे 2013 (19:18 IST)

स्पॉट फिक्सिंग: विंदू दारा सिंह अटकेत

FILE
विश्वविख्यात मल्ल व अभिनेते दारासिंह यांचा मुलगा विंदू रंधावा याला आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कथितरीत्या सहभागासाठी अटक करण्यात आली आहे.

सट्टेबाजांना विचारपूस करताना विंदू दारासिंह यांचे नाव सामोरे आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. मुंबई क्राईम ब्रँच त्यांना याप्रकरणी विचारपूस करत असून 24 मे पर्यंत ते पोलिस कोठडीत राहतील.

सट्टेबाज रमेश व्यास याला विचारपूस करताना विंदूंचे नाव सामोरे आले. विंदूचे सट्टेबाजांसोबत संबंध असू शकते, अस मानण्यात येत आहे. विंदूच्या अटकेनंतर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बॉलीवूडचा संबंध असण्याची शक्यता आणखी प्रबळ झाली आहे.

आयपीएलमध्ये 6 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यादरम्यान विंदू दारा सिंह महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी सोबत बसलेला आढळला होता. हे प्रकरणही गंभीर घेण्यात आले आहे.

विंदूस आयपीएल सामन्यांदरम्यान कित्येकदा क्रिकेट क्षेत्रातील ओळखीच्या लोकांसोबत बघण्यात आले आहे. ते रियालिटी शो बिग बॉस चे विजेते राहिले आहेत. (वृत्तसंस्था)