स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीशांतला अटक
आयपीएल खेळ एकदा परत विवादात अडकले आहे. दिल्ली पोलिसाने स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून श्रीशांत आणि राजस्थान रॉयल्सचे इतर दोन खेळाडू अजित चंडिलिया आणि अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मरिन ड्राईव्ह येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये आज सकाळी छापा टाकला. यावेळी स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलिया यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह सात बुकींनाही अटक करण्यात आल्याचे समजते. मोहाली आणि मुंबईतील आयपीएल सामन्यांचा काही भाग फिक्स करण्यात आला होता, असे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला होता. या प्रकरणी आणखी काही खेळाडूंना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी पैसे आणि स्पॉट फिक्सिंगचे साहित्य जप्त केले आहे.