1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (11:56 IST)

व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला आणि 40 हजार रुपयांचे नुकसान झाले, काय आहे संपूर्ण प्रकरण काय ते जाणून घ्या

आजच्या युगात प्रत्येकजण इन्स्टंट मेसेजिंग एप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. याव्यतिरिक्त, व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना फोटो, व्हिडिओ आणि संदेश शेअर करण्याची परवानगी देखील देतो. तथापि, या प्लॅटफॉर्मवर बनावट संदेशांची संख्या कित्येक महिन्यांपासून वाढली आहे, ज्यामुळे लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागात महाराष्ट्रातील ठाणे शहरातून एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये 53 वर्षीय लष्करी अधिकार्‍यास पैशासाठी फसवले गेले आहे. तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण ...
 
6 डिसेंबर रोजी व्हाट्सएपवर मिस कॉल आला
खरं तर, 6 डिसेंबर रोजी लष्करी अधिकार्‍याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिस कॉल आला. त्यांनी पुन्हा त्या नंबरवर कॉल केला तर कॉल चालू नव्हता. थोड्या वेळाने, त्याच नंबरवरून त्याला एक मेसेज आला, ज्यामध्ये त्या वापरकर्त्याने स्वतःला आपला मित्र कर्नल हरपाल सिंग असे सांगितले.
 
सैन्य अधिकार्‍याने त्या नंबरवर प्रतिक्रिया दिली तेव्हा फसवणूक करणार्‍याने सांगितले की तो आणि त्याची पत्नी अमेरिकेत आहेत आणि आपल्या बहिणीचा उपचार करायचा आहे. त्याचवेळी त्याने अधिकारी मित्राकडे उपचारासाठी पैशाची मागणी केली. यानंतर फसवणूक करणार्‍याने सांगितले की तो अमेरिकेत आहे, ज्यामुळे तो पैसे हस्तांतरित करू शकत नाही. पुढे, त्याने ऑफिसर मित्राच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अकाउंट नंबर पाठविला.
 
लष्करी अधिकार्‍याने फसव्याचा संदेश योग्य समजून घेतला आणि त्या खात्यात 40,000 रुपये ट्रान्स्फर केले. आणखी 20 हजार रुपयांची मागणी केली असता त्याला संशय आला. त्या अधिकार्‍याने ताबडतोब आपल्या मित्र हरपालसिंगला फोन केला आणि ते अमेरिकेत नसून पंजाबमध्ये असल्याचे समजले. तसेच हरपालसिंग यांनी कधीही पैशांची मागणी केली नाही. यानंतर लष्करी अधिकार्‍याने पोलिसांत घटनेची तक्रार दिली. दुसरीकडे, पोलिस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 
व्हाट्सएपच्या बनावट मेसेजपासून सावध राहा
आपल्याकडेही व्हॉट्सअ‍ॅपवर पैसे मागितल्याचे मेसेज आल्यास, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तसेच, संदेशाच्या आधारावर आपल्या कोणत्याही मित्र आणि नातेवाइकांना पैसे पाठवू नका. बरेच हॅकर्स वापरकर्त्यांची फसवणूक करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवतात, ज्यामुळे ते हॅकर्सचे बळी ठरतात. तर, तुमचा अकाउंट नंबर इतर कोणाशीही शेअर करू नका, अन्यथा तुम्हाला लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते.