गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जून 2019 (18:34 IST)

BSNL ने लॉन्च केला 'अभिनंदन-151' प्री-पेड प्लॅन

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने एक नवीन प्री-पेड प्लॅन लॉन्च केला आहे. BSNL ने त्याचे नाव 'अभिनंदन-151' ठेवले आहे, तथापि BSNL चा हा प्लॅन सध्या चेन्नई आणि तमिळनाडू सर्कलमध्येच उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दररोज 100 एसएमएस देखील मिळतील. यासह दररोज 1 जीबी डेटा देखील मिळेल आणि या योजनेची किंमत 151 रुपये आहे. 
 
सर्व सर्कल्समध्ये अनलिमिटेड लोकल-एसीटीडी आणि रोमिंग कॉलिंगची सुविधा मिळेल. विशेष गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये आपल्याला दिल्ली आणि मुंबईमध्ये देखील कॉलिंग सुविधा उपलब्ध होईल जे इतर योजनांसह मिळत नाही. तथापि, या योजनेसह मिळणार्या मोफत सेवा फक्त 24 दिवसांपर्यंतच वैध असतील. अशा मध्ये योजनेची वैधता 180 दिवस असेल पण फ्री कॉलिंग आणि मेसेज केवळ 24 दिवसांसाठी उपलब्ध असतील. ही योजना सक्रिय करण्यासाठी ग्राहकांना PLAN 151 टाइप करून 123 वर एक मेसेज पाठवावं लागेल. 
 
महत्वाचे म्हणजे BSNL ने नुकतेच BSNL 4G Plus सर्व्हिस लॉन्च केली आहे. BSNL ची ही सेवा एक हॉट-स्पॉट सेवा आहे ज्या द्वारे लोकांना हाय-स्पीड इंटरनेट देण्यात येईल. लोकांच्या सोयीसाठी कंपनी संपूर्ण देशात जागो-जागी वाय-फाय हॉटस्पॉट लावेल, याद्वारे लोकांना इंटरनेट मिळेल. BSNL च्या वाय-फाय हॉटस्पॉट रेंजमध्ये असल्यावर आपण सहज आपल्या फोनमध्ये 4G डेटा वापरू शकाल. अशा मध्ये आपण BSNL च्या या वाय-फाय नेटवर्कचा वापर स्वत:च्या फोन नेटवर्कच्या रुपात करण्यास सक्षम असाल.