आता ऑनलाइन व्यवहार करताना डेबिट- क्रेडिट 16 अंकी कार्ड क्रमांक आवश्यक, RBI चा नवा नियम जाणून घ्या

Last Modified शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (11:48 IST)
ऑनलाइन व्यवहार करताना आता दरवेळी डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा 16 अंकी कार्ड क्रमांक टाकणे आवश्यक असेल. RBI च्या नवीन नियमानुसार आता ग्राहकाच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा क्रमांक, मुदत, नाव ही माहिती वेबसाईटवर सेव्ह करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक व्यवहारावेळी 16 अंकी कार्ड क्रमांक आणि इतर माहिती द्यावी लागेल.
यापूर्वी डेबिट किंवा क्रेडिट कार्डं वापरून कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना आपोआप साइटकडून विचारल्यावर डिटेल्स सेव्ह होत होते. जेणेकरून प्रत्येक व्यवहारावेळी 16 अंकी कार्ड क्रमांक आणि इतर माहिती द्यावी लागत नाही परंतू आता आरबीआयने काढलेल्या नव्या नियमानुसार ऑनलाइन व्यापारी, पेमेंट अग्रिगेटर आणि ई-कॉमर्स वेबसाईट्सना ग्राहकाच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा क्रमांक, मुदत, नाव ही माहिती त्यांच्या वेबसाईटवर सेव्ह करता येणार नाही. हा नियम जुलै 2021 पासून लागू होणार आहे. या नियमामुळे आता दरवेळी व्यवहार करताना ग्राहकाला कार्डमध्ये बघून किंवा अंक पाठ असतील तर त्याप्रकारे कार्डाची माहिती भरावी लागणार आहे.
RBI चा नवा नियम

आरबीआयच्या या नियामामुळे ग्राहकांच्या सुरक्षेत भर पडेल कारण ग्राहकाच्या कुठल्याही कार्डाचे डिटेल्स वेबासाईट्सकडे नसल्यामुळे ग्राहकाचे ऑनलाइन व्यवहार सुरक्षित होतील. ऑनलाईन सायबर गुन्हे प्रचंड वाढत असल्यामुळे हे पाउल उचलण्यात येत आहे. कारण वेबसाईटवर साठवलेली ही माहिती सुरक्षित आहे असं जरी या वेबसाइट्स सांगत असल्या तरीही तो डाटा हॅक करून त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.

अनेकदा हा डेटा इतर कंपन्यांना विकला जाऊ शकतो आणि मग ही कार्ड वापरणाऱ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रमोशनल मेसेज येतात. अशा प्रकारे मेसेज करणारे ऑफर देतात आणि अनेकदा याद्वारे ही फसवणूक केली जाते. त्यामुळे हा नियम ग्राहकासाठी हिताचा आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

तळीरामांसाठी खुषखबर! नाशकात आता घरपोच मिळणार दारु

तळीरामांसाठी खुषखबर! नाशकात आता घरपोच मिळणार दारु
मद्यपींना आता घरपोच दारु मिळणार आहे. पण, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लायसन्स ...

यामुळे पुणे पालिकेचा हेल्पलाईन नंबर लागत होता सतत व्यस्त…

यामुळे पुणे पालिकेचा हेल्पलाईन नंबर लागत होता सतत व्यस्त…
पुणे शहर कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत. ...

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांची ...

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांची कविता तुफान व्हायरल
महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ...

कुंभ आणि कोरोना:'हरिद्वारची परिस्थिती पाहून मी देवाच्या ...

कुंभ आणि कोरोना:'हरिद्वारची परिस्थिती पाहून मी देवाच्या भरवशावर सगळं काही सोडून दिलं'
मुंबईचे रहिवासी 34 वर्षीय उद्योजक आणि फोटोग्राफर उज्ज्वल पुरी 9 मार्च रोजी सकाळी ...

पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांच्यात कोरोना लशीवरून 'ट्वीटवॉर'

पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांच्यात कोरोना लशीवरून 'ट्वीटवॉर'
महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढतोय, त्यात दुसरीकडे कोरोना लशीचा ...