बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2019 (10:36 IST)

रेडमिचे नवीन तीन फोन बाजारात लवकर दाखल होणार

भारतात सध्या MI या स्मार्टफोन कंपनीचे अनेक फोन जोरदार विक्री होतांना दिसून येतय. तर MI च्या स्मार्टफोनची क्रेझ अजूनही वाढत आहे. त्यामुळे शाओमी कंपनीद्वारे येत्या 15 जुलैला Redmi K20 आणि Redmi K20 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात येणार असून सोबतच Redmi 7A  हा आणखी एक नवा फोन लाँच केला जाणार आहे. एका खासगी वेबपोर्टल ने दिलेल्या माहिती नुसार पुढील 3 महिन्यात MI कंपनीद्वारे तीन नवे स्मार्टफोन भारतात लाँच होतील. यामध्ये Redmi 7A, Redmi K20, Redmi K20 Pro अशी या तीन स्मार्टफोनची नावे आहेत. MI च्या कंपनीने Redmi 7A हा स्मार्टफोन इतर देशात याआगोदर लाँच केला आहे. त्यामुळे लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत कंपनीद्वारे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मात्र या बातमीचे खंडन सुद्धा कंपनीने केले नाही, तर भारत हा जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने व रिअलमी कंपनी जोरदार टक्कर देत असल्याने एम आय चे फोन लवकर बाजारात दिसणार आहेत.