एक दिवस कृष्णाने सकाळीच घाइघाईत सगळ्या त्याच्या सवंगड्यांना आवाज दिला अन् सर्वांना आपापल्या घरात जे काही शिळेपाळके आहे त्याच्या शिदोर्या घेऊन रानाकडे कूच करण्यास सांगितले. दुपारी गाईंना चरावयास सोडल्यावर सगळ्यांनी आपापल्या शिदोर्या सोडल्या. श्रीकृष्णाने त्या सगळ्या शिदोर्या एकत्र करून त्याचा काला केला. नंतर तो काला सर्वजण एकमेकांना प्रेमाने भरवू लागले. असा कृष्णाच्या हातचा अमुल्य प्रसाद आपल्यालाही मिळावा म्हणून देवादिक माशांच्या रूपाने येऊन यमुनेत उतरले. पण कृष्णाच्या सवंगड्यांची कृष्णावर जशी भक्ती होती, श्रध्दा होती. त्यामुळे त्यांना कृष्णाने दिलेला काला देवांना कसा मिळेल?