1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

72 हजार रुपये गरीब कुटुंबाच्या खात्यात टाकले जातील: राहुल गांधींची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्यांचं मासिक उत्पन्न १२ हजारापेक्षा कमी आहे त्यांना वर्षाला ७२ हजार रुपये देणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. 
 
यामुळे देशातील 5 कोटी कुटुंब आणि 25 कोटी लोकांना फायदा होणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. प्रत्येक कुटुंबाचं किमान उत्पन्न १२ हजार रुपये करण्याची योजना असल्याचंही राहुल गांधींनी यावेळी सांगितलं आहे. ही योजना जाहीर करण्याआधी सर्व चर्चा आणि गणितं करण्यात आली असून जगात कोणत्याही देशात अशी योजना नसल्याचं राहुल गांधींनी सांगितलं आहे.
 
या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधत राहुल गांधी बोलले जर नरेंद्र मोदी देशातील श्रीमंतांना पैसे देऊ शकतं, तर काँग्रेस गरिबांना पैसे देऊ शकतं नाही का ? मोदींनी श्रीमंतांचा आणि गरिबांचा असे दोन भारत निर्माण केले आहेत. पण आम्ही एकच भारत निर्माण करणार आहोत, असं राहुल गांधींनी म्हटलं. 
 
राहुल गांधी यांनी देशातील गरिबांना किमान उत्पन्नाची हमी दिली आहे. देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.