मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

जालना लोकसभा निवडणूक निकाल 2019 live results

[$--lok#2019#state#maharashtra--$] 
मुख्य लढत : रावसाहेब दानवे (भाजप) विरुद्ध विलास औताडे (काँग्रेस) विरुद्ध डॉ. शरदचंद्र वानखेडे (वंचित बहुजन आघाडी)
 
भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यामध्ये भाजपला विजय मिळवून दिला आहे. अगदी पक्ष कार्यकर्ता ते खासदार असा त्यांचा प्रवास आहे. रावसाहेब दानवे यांनी २३ पैकी २२ निवडणुकांमध्ये सलग विजय मिळवला आहे. रावसाहेब दानवे हे शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांना भाजप नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी रावसाहेब दानवे यांचे नेतृत्व राजकारणात पुढे आणले. जवखेडा गावातील भाजप शाखाप्रमुखापासून त्यांचा प्रवास सुरु झाला. पक्षाचे तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष असा भाजपमधील प्रवास करत रावसाहेब दानवे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री हा त्यांचा राजकारणातील प्रवास उल्लेखणीय मानला जातो. रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास ग्रामपंचायतीपासून सुरु झाला. दानवेंनी १९८० साली भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर १९९० आणि १९९५ असं दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून आले. त्यानंतर १९९९, २००४, २००९, २०१४ असं ४ वेळा ते खासदार झाले. तसंच दानवे केंद्रीय ग्राहक हक्क, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री होते.
[$--lok#2019#constituency#maharashtra--$] 
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.