बिहारमध्ये एनडीएचे वर्चस्व
बिहारच्या सुपौल लोकसभा मतदार संघातून जदयूचे विश्वमोहन कुमार हे कॉग्रेस उमेदवाराला पछाडत आघाडीवर आहेत. मुजफ्फरपुरवरही जदयूच्या उमेदवाराने लोकजनशक्ती पक्षाच्या भगवान लाल साहनी यांना पाणी पाजले असून, बिहारच्या बहुतांश जागेवर जदयूचेच उमेदवार आघाडीवर असल्याने बिहारमध्ये भाजप आणि जदयू आघाडीत जल्लोष आहे.