सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वेबदुनिया|

चिदंबरम यांचा दुसर्‍या क्रमांकाचा निसटता विजय

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूत सर्वांत कमी मतांनी जिंकणारे दुसर्‍या क्रमांकाचे उमेदवार ठरले आहेत.

दक्षिण शिवगंगा मतदारसंघातून विजयी झालेल्या चिदंबरम यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अभाद्रमुकचे के.आर.एस. राजकन्नप्पन यांचा ३३५४ मतांनी पराभव केला. यापूर्वीच्या सर्व निवडणुकांत चिदंबरम बहूमताने विजयी होत होते.

सर्वांत कमी मतांनी जिंकण्याचा 'विक्रम' मात्र तमिळनाडूतील विल्लुरपरम लोकसभा मदारसंघातून विजयी झालेल्या अण्णाद्रमुकच्या एम. आनंदन यांच्या नावे आहे. त्यांनीप्रतिस्पर्धी व्हि.सी.केच्या के. के. सामीदुराई यांना २७९७ मतांनी पराभूत केले.