सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

जनतेचा विश्वास सार्थ ठरवू- सोनिया

जनेतेने पुन्हा एकदा कॉग्रेस आघाडीला बहुमत देत सत्ता दिली असून, पक्षाने जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पाळू आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरवू असे मत कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे.

कॉग्रेस पक्ष नेतेपदी आज पुन्हा एकदा मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली असून, संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनियांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यानंतर बोलताना सोनिया यांनी जनतेचे आभार मानत आता सरकार जनतेला दिलेली आपली सर्व आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

कॉग्रेसच्या हातात सत्ता असल्याने आता जनतेचे भविष्य सुरक्षित असून, पक्षाने जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर दिल्यानेच हा विजय मिळाल्याचे त्या म्हणाल्या.