विरोधीपक्ष नेते अडवाणीच-राजनाथ
पी एम इन वेटिंग असलेल्या भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना आता विरोधी पक्ष नेतेपदावर समाधान मानावे लागणार असून, पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पक्षाचा पराभव स्वीकारत अडवाणीच विरोधी पक्ष नेते असणार असल्याचे जाहीर केले आहे. निवडणूक निकालांनी नाराज राजनाथ यांनी आज अडवाणी यांची भेट घेतली. निकाल धक्कादायक असून, जनादेश आपल्याला आणि पक्षाला मान्य असल्याचे ते म्हणाले. निवडणूकीत अपयश आले असले तरी एनडीएमध्ये फूट पडणार नसल्याचे ते म्हणाले. निवडणूक निकाल लागत असतानाच आज राजनाथ आणि पक्षाचे माजी अध्यक्ष वेंकैय्या नायडू यांनी अडवाणी यांची त्यांच्या घरी भेट घेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.