रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (11:52 IST)

सुवर्णपदक विजेत पुनिया आणि विनेशला रेल्वेत पदोन्नती

आशियाई क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा कुस्तीगीर बजरंग पुनिया आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांना रेल्वेत बढती ळिणार आहे. या दोन्ही खेळाडूंना राजपत्रित अधिकारी (गॅझेट ऑफिसर) पदी पदोन्नती देण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले.
बजरंग आणि विनेश या दोघांनाही रेल्वे नियमांच्या अधीन राहूनच पदोन्नती दिली जाणार असल्याचे रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ऑगस्ट रोजी खेळाडूंना पदोन्नती देण्यासाठी एक धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू आणि पद्मश्री विजेत्या प्रशिक्षकांना अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात येणार आहे.